शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

‘तो’ मृतदेह महालगाव येथून बेपत्ता तरुणीचा तर नव्हे !

By admin | Updated: December 13, 2014 22:33 IST

मागील आठवड्यात ५ डिसेंबर रोजी सुरेवाडा जंगलात एका महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्याच दिवशी साकोली तालुक्यातील महालगाव (सुकळी) येथून २१ वर्षीय तरूणी बेपत्ता झाली होती.

भंडारा : मागील आठवड्यात ५ डिसेंबर रोजी सुरेवाडा जंगलात एका महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्याच दिवशी साकोली तालुक्यातील महालगाव (सुकळी) येथून २१ वर्षीय तरूणी बेपत्ता झाली होती. त्यामुळे या दोन्ही घटनेतील महिला एकच तर नसावी ना? याबाबत तर्कवितर्कांना ऊत आला आहे.मुंबई मालाड येथील दीपाली हरिभाऊ काळे ही २१ वर्षीय तरुणी महालगांव येथील सागर हटकर यांच्याकडे पाहुणी म्हणून आली होती. ५ डिसेंबर रोजी ती सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास फिरायला जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र त्यानंतर ती घरी परत आली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर दीपाली काळे ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार साकोली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोंडउमरी पोलीस चौकीत करण्यात आली. मुंबईची तरुणी गावखेड्यातून बेपत्ता झाल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ५ डिसेंबरला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुरेवाडा येथील शंकरपटाच्या मैदानावर एक महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. बेपत्ता झालेली ही युवती अद्याप सापडलेली नाही. आणि जळालेल्या महिलेबाबतही पोलिसांना कुठलिही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे जळालेला तो मृतदेह हा महालगाव येथून बेपत्ता झालेल्या युवतीचा तर नसावा ना?, याबाबत शंकांना पेव फुटले आहे. याबाबत साकोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कारधा पोलीस ठाण्यांतर्गत मिळालेला मृतदेह ‘त्या’ युवतीचा आहे. तर कारधाचे ठाणेदार राजेश शेट्टे हे जळालेल्या महिलेसंबंधी बेपत्ता तक्रारींची शहानिशा केली. मात्र वैद्यकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर बेपत्ता झालेल्या युवतीशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत आहेत. (शहर प्रतिनिधी)