शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ मृतदेह बेपत्ता विद्यार्थीनीचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

साकोली येथील नर्सरीत बुधवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. या मृतदेहाजवळ स्कूल बॅग आढळली. त्यात शाळेचा गणवेश, पुस्तके व पावडरची पुडी आढळली होती. तसेच मृतदेहाजवळ चप्पल आणि हातात घड्याळ होती. मात्र सदर मृतदेह नेमका कुणाचा याचा बोध होत नव्हता. दरम्यान साकोली येथून ४० दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या दहाव्या वर्गातील विद्यार्थीनीचाच हा मृतदेह असावा, असा कयास पोलिसांचाच होता.

ठळक मुद्देसाकोलीचे प्रकरण : ओळख पटली, आत्महत्या की हत्या, प्रश्न कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह ४० दिवसांपुर्वी बेपत्ता झालेल्या साकोली येथील विद्यार्थीनीचाच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे संभ्रमात सापडलेल्या पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र सदर विद्यार्थीनीची आत्महत्या की खून हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे.साकोली येथील नर्सरीत बुधवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. या मृतदेहाजवळ स्कूल बॅग आढळली. त्यात शाळेचा गणवेश, पुस्तके व पावडरची पुडी आढळली होती. तसेच मृतदेहाजवळ चप्पल आणि हातात घड्याळ होती. मात्र सदर मृतदेह नेमका कुणाचा याचा बोध होत नव्हता. दरम्यान साकोली येथून ४० दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या दहाव्या वर्गातील विद्यार्थीनीचाच हा मृतदेह असावा, असा कयास पोलिसांचाच होता. परंतु पालकांनी सदर मृतदेह आपल्या मुलीचा नाही, अशी भूमीका घेतली होती. परंतु मृतदेहाजवळ आढळलेले सर्व साहित्य आपल्या मुलीचे आहे, असे सांगत होते. त्यामुहे हा मृतदेह नेमका कुणाचा, असा संभ्रम निर्माण झाला होता.दरम्यान उशिरा रात्री सदर मुलीच्या पालकांनी मृतदेहाच्या आंगावरील कपडे, बॅग, पुस्तके, बॅगमधील कपडे व इतर साहित्यावरून मृतदेह माझ्या मुलीचाच असल्याची ओळख दिली. त्यामुळे दिवसभर निर्माण झालेला संभ्रम संपुष्टात आला. मात्र तिचा खून झाला की आत्महत्या हा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे. पोलीस पथके त्यादृष्टीने शोध घेत आहेत. सदर विद्यार्थीनी १४ डिसेंबर २०१९ रोजी बेपत्ता झाली होती.पोलिसांच्या तपासात सदर मुलगी शाळेत न जाता नागझिरा रोडवरील मैत्रीनीच्या घरी गेली. तिथे तिने शाळेचा गणवेश बदलवून दुसरे कपडे परिधान केले. त्यानंतर ती सायकलीने तेथून निघून गेली, असे पुढे आले होते. दरम्यान तिचा शोध सुरू असताना नर्सरीत मृतदेह आढळला. सदर मृतदेह बेपत्ता विद्यार्थीनीचाच असल्याचा दावा सुरूवातीपासून पोलीस करीत होते. अखेर पोलिसांचा हा दावा खरा ठरला. आता पोलिसांपुढे सदर विद्यार्थीनीच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचे आवाहन उभे ठाकले आहे.मृतदेह घेऊन नातेवाईक धडकले साकोली ठाण्यावरविद्यार्थीनीच्या मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करा, तपास सीबीआयकडे द्या आणि चौकशी असलेल्या जमादाराचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी करीत सदर विद्यार्थीनीचे नातेवाईक रात्री ८ वाजता मृतदेहासह साकोली पोलीस ठाण्यावर धडकले. नागपूर येथे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर नातेवाईक पोलीस ठाण्यावर पोहचले. याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे यांना निवेदन देण्यात आले.मृतदेह घेवून आलेली शववाहिनीत्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. याप्रकरणी न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.मृत्यूचे कारण गुलदस्त्यातसदर विद्यार्थीनी घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. मात्र ती शाळेत पोहचली नाही. अचानक बेपत्ता झाली. शोध घेतल्यानंतरही थांगपत्ता लागत नव्हता. परंतु अचानक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह नर्सरीत आढळला. त्यामुळे तिची हत्या आहे की आत्महत्या हा प्रश्न कायमच आहे. तिच्या मृत्यूच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. 

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू