शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

भंडाऱ्यात पावसाचा धुमाकूळ; बोदरा तलाव फुटल्यानं अनेक मार्ग बंद, घरांमध्ये शिरलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 10:18 IST

काल दुपारपासून भंडाऱ्यात पावसाचा जोर; अनेक भागांना पावसाचा तडाखा

भंडारा : जिल्ह्यात गुरुवार दुपारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हाहाकार उडाला आहे. नदीनाल्यांना पूर आला असून अनेक रस्ते बंद झाले. सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरुन पडझड झाली. बोदरा येथील तलाव फुटला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

जिल्ह्यात गुरुवार दुपारपासून जोरदार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस बरसत होता. शुक्रवारी पहाटे विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली. या पावसाने तुमसर ते येरली रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने पुलावरून तीन फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे पूल बंद झाला आहे. साकोली येथील एकोडी रोड परिसरातील अनेक घरांमध्ये नवतलावाचे पाणी शिरले आहे. साकोली-तुमसर रस्ता चांदोरी गावाजवळ नाल्याला पूर आल्याने बंद आहे. तसेच साकोली-परसोडी, साकोली-विरसी-सातलवाडा ,साकोली-जमनापुर हे मार्गही बंद आहेत. बोदरा गावातील तलाव फुटला असून जीवितहानी झालेली नाही. लाखनी तालुक्यातील मुरमाडी गावातील शिवनगर वॉर्डात पाणी वाढत असून काही घरात पाणी शिरले आहे.रेंगेपार कोठा गावातील तलाव ओव्हर फ्लो होऊन गावात पाणी शिरत आहे. मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील अनेक घरांत पुराचे पाणी शिरले आहे. लाखनी तालुक्याच्या मऱ्हेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद आहे. भंडारा शहरातील अनेक भागातील घरांत पाणी शिरले असून घरांची पडझड झाली आहे.