शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

दिघोरीत जलयुक्त शिवार योजना ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:29 IST

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली.

ठळक मुद्देविहीर पुनर्भरणामुळे पाण्याच्या पातळीत वाढ : बंधाऱ्यामुळे मिळतेय शेतीला पाणी

मुकेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे.जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली. यामुळे विहिरीतील पाण्याच्या पातळीत ३५ टक्के वाढ दिसून आल्याने विहीर पुनर्भरण योजना कमालीची यशस्वी ठरली. त्यामुळे या शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचा पेरा नक्कीच वाढेल यात दुमत नाही.तसेच याअगोदर बांधलेल्या सात बंधाऱ्यांची नव्याने दुरुस्ती करुन संपुर्ण लिकेज बंद करण्यात आला असल्याने पावसाचे पाणी थेट वाहून न जाता बंधाऱ्यात साचून राहिले. त्यामुळे बंधाऱ्यालगतच्या सर्व शेतकºयांना पावसाने दडी मारल्यावर सुध्दा पीक वाचविणे शक्य झाले.आजघडीला बंधाऱ्यात अजूनही भरपूर पाणी असल्याने कडधान्य पिके घेणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल यावरुन असे लक्षात येते की, शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे दोनदा पिक घेणे शक्य होईल.यासोबतच दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेतून सात वनतलाव, तीन साठवण तलाव, लोकसहभागातून सात तलावातील गाळ काढण्यात आली, तसेच तीन तलावांचे खोलीकरण करण्यात आणि एक नवीन बंधारा तयार करण्यात आल्याने दिघोरीच्या सभोवताल पाणी साठविण्याचे जाळे तयार झाले. यावर्षी पोळ्यापासून पावसाने दडी मारली असली तरी दिघोरीत पाण्याची अडचण निर्माण न होता. तलाव व बंधाºयामार्फत शेतीला मुबलक पाणी देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक दर्जा उंचावण्यास खूप मोठी मदत झाली.यावर्षी अत्यल्प पाऊस पडला असला तरी दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेतून दिघोरीत झालेल्या कामामुळे जमिनीतील भूजल पातळी विशेष घट झाली नसल्याचे विहिरीतील पाण्याच्या स्त्रोतावरुन कळून येते. म्हणून दिघोरीसाठी जलयुक्त शिवार योजना वरदान ठरली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.शासनाची जलयुक्त शिवार सर्वेक्षणाची टिम दिघोरीत दाखल झाली व त्यांनी बंधारे, विहिर पुनर्भरण योजना आदींचा आढावा घेतला असता जलयुक्त शिवार योजना दिघोरीत यशस्वीपणे राबविले असल्याचे अधिकारी मिलिंद शेंडे यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ सांगितले. यावेळी भूवैज्ञानिक अजय सांपत, जिल्हा समन्वयक एन. टी. अतकरी, सरपंच अरुण गभणे, उपसरपंच रोहीदास देशमुख, तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम कृषी विस्तार अधिकारी प्रमोद वानखेडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार