शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या वादातून गळा चिरून तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2017 00:18 IST

दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पाच तरूणांनी मिळून एकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला.

मोठा बाजार परिसरातील घटना : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच केली पाच आरोपींना अटकलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पाच तरूणांनी मिळून एकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरातील हनुमान मंदिर गेटजवळ घडली. यातील पाचही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन तासात अटक केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.हितेश मनोहरलाल ईसराणी (राजा सिंधी) (३५) रा.भंडारा असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आसिफ शेरखाँ पठाण (३५), अन्वर ताराखाँ पठाण (३०), हमीद अहमद पठाण (२६), आकाश गेंदलाल सोनेकर (२३), रा. बाबा मस्तानशाह वॉर्ड, भंडारा, शाबीर खाँ ऊर्फ भुऱ्या जमीर पठाण (२६), रा.अन्सारी वॉर्ड भंडारा या आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरातील गजबजलेला परिसर म्हणून मोठा बाजार चौक ओळखला जातो. हनुमान मंदिर प्रवेशद्वाराजवळ राजा याचे पानठेला दुकान आहे. पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, या भागात काही ठिकाणी दारू विक्रीचा व्यवसाय होतो. आरोपी तरूणांना दारू पिण्याची सवय आहे. नेहमीप्रमाणे हे तरूण मंगळवारला दुपारी त्याठिकाणी गेले होते. यावेळी राजा आणि आरोपी यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर ते तरूण तिथून परतले. मात्र, त्यांनी राजा याला जीवे मारण्याचा कट रचला. मंगळवारला रात्रीच्या सुमारास हे सर्व आरोपी तरूण राजाच्या शोधात त्याच्या दुकानाकडे गेले. त्यावेळी राजाचा त्या तरूणांशी वाद झाल्याने या पाचही आरोपींनी त्याच्यावर हल्ला करून धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. यात भीषण हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. ही माहिती भंडारा पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. याची माहिती प्रभारी पालीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांना देण्यात आली. त्यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना तपासाचे आदेश दिले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिल्यानंतर आरोपींबाबत माहिती घेऊन परिसरात नाकाबंदी केली. त्यानंतर पाचही आरोपींना मोठ्या शिताफिने रात्रीच अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक पोलीस निरीक्षक एस. एच. रिजवी, विनोद रहांगडाले, पोलीस कर्मचारी अरूण झंझाड, नेपालचंद्र टिचकुले, राजेश गजभिये, सुधिर मडामे, वामन ठाकरे, धर्मेंद्र बोरकर, सावन जाधव, साकुरे, रेहपाडे, नंदनवार, चव्हाण, मंगलसिंग कुथे, रमेश चोपकर, रोशन गजभिये, क्रिष्णा बोरकर, दिनेश आंबेडारे, बबन अतकरी, गभणे, रमाकांत बोंद्रे, कौशिक गजभिये, वैभव चामट, स्रेहल गजभिये, चेतन पोटे, सुप्रिया मेश्राम, योगिता जांगळे, चालक रामटेके आदींनी केली.आरोपीने मारल्या स्लॅबवरून उड्याराजा इसरानी खून प्रकरणातील आरोपी अन्वर पठाण हा घटनेनंतर एका घराच्या स्लॅबवर लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या शोधात असलेले पोलीस त्या घरी पोहोचल्याची माहिती त्याला होताच, त्याने स्लॅबरून खाली उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान आरोपीने एका ठिकाणची सुमारे १२ ते १३ फुट उंच संरक्षण भिंतीवरून उडी मारून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. त्या पाठोपाठ पोलिसांनीही स्वत:चा जीव धोक्यात घालून भिंतीवरून उड्या मारून पाठलाग केला आणि आरोपीला ताब्यात घेतले.