शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

भाजपचा दणदणीत विजय

By admin | Updated: October 19, 2014 23:15 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही क्षेत्रात भाजपने दणदणीत विजय मिळवून एकहाती विजय संपादन केला आहे. यावेळी काँग्रेस,

भंडारा : लोकसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही क्षेत्रात भाजपने दणदणीत विजय मिळवून एकहाती विजय संपादन केला आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बसपा, मनसे या पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढूनही भाजपने तिन्ही जागांवर आपले प्रभुत्व सिद्ध केले.सन २००९ च्या निवडणुकीत आघाडी आणि युती अशी थेट निवडणूक झाली असताना युतीकडे दोन तर आघाडीने एका जागेवर विजय मिळविला होता. यावेळी भाजपने तिन्ही जागा जिंकल्या आहेत. तुमसरात चरण वाघमारे, भंडाऱ्यात रामचंद्र अवसरे तर साकोलीत राजेश काशीवार या सर्वांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय नोंदविला. वाघमारे आणि काशीवार यांच्या विजयाचा प्रवास आता ‘मिनी मंत्रालय ते बिग मंत्रालय’ पर्यंत पोहोचला आहे.तुमसर क्षेत्रात भाजपचे चरण वाघमारे हे २८,६७९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ७३,९५२ मते मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांना ४५,२७३ मते मिळाली. त्यानंतर शिवसेनेचे राजेंद्र पटले यांना ३६,००५ तर काँग्रेसचे प्रमोद तितीरमारे यांना १७,५७९ मतांवर समाधान मानावे लागले. भंडारा क्षेत्रात भाजपचे अ‍ॅड. रामचंद्र अवसरे हे ३६,८३२ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ८३,४०८ मते मिळाली असून बसपाच्या देवांगना गाढवे यांना ४६,५७६ मते मिळाली. त्यानंतर शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांना ४२,७६६ तर काँग्रेसचे युवराज वासनिक यांना ३०,६५५ मतांवर समाधान मानावे लागले. भंडाऱ्यात सन २००९ मध्ये युतीच्या बळावर शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर ५५ हजारांहून अधिक मताधिक्यानी विजयी झाले होते. यावेळी त्यांना मताधिक्याएवढीही मते मिळाली नाहीत, हे विशेष.साकोली क्षेत्रात भाजपचे राजेश काशीवार हे २५,४८९ मतांनी विजयी झाले. त्यांना ८०,९०२ मते मिळाली असून काँग्रेसचे सेवक वाघाये यांना ५५,४१३ मते मिळाली. त्यानंतर बसपाचे महेंद्र गणवीर यांना ३१,६४९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल फुंडे यांना १९,८८८ मतांवर समाधान मानावे लागले. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली होती. त्यानंतर ही लिड मागे पडली नाही. दुपारी २ वाजतानंतर कौल स्पष्ट होऊ लागल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला होता. (जिल्हा प्रतिनिधी)