पवनी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अदाखल गुन्ह्याची नोंद करून अटक करण्यात आली.
महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार करणारे, खंडणीखोर मोकाट वावरतात मात्र मंत्री राणे यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्रातील पोलीस कामास लागले. यावरून विरोधकांना संपवण्याचे राजकारण चालू आहे, याचा निषेध करण्यासाठी माजी आमदार ॲड. रामचंद्र अवसरे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड. रामचंद्र अवसरे, ॲड. एकनाथ बावनकर, अनिल मेंढे, मोहन सुरकर, डॉ. संदीप खंगार यांनी संबोधित केले.
यावेळी मच्छिंद्र हटवार, राजेंद्र फुलबांधे, प्रकाश कुर्झेकर, पांडुरंग गभणे, सुरेश अवसरे, दत्तू मुनतीवार, सोनू कोरेकर, अनुराधा बुराडे, निर्मला तलमले, माधुरी हाडगे, किसनाबाई भानारकर, शरद देवाडे, दिगंबर वंजारी, विनोद धारणे, रत्नाकर लेपसे, ॲड. राहुल बावने, ॲड. विद्यानंद बनारसे, ॲड. खेमराज जिभकाटे, माधुरी हाडगे, कविता कुळमते, लता तपाडकर, भास्कर उरकुडकर, विलास डाहारे, गिरीधर उरकुडकर, भास्कर आसई, विनोद कापगते, हरिचंद्र भेंडारकर, राजेश चोपकर, यादव धनजुळे, रवि जांभूळकर, भास्कर आसई, मारुती चाचेरे, महेश कुंभलकर, प्रमोद मेश्राम, महेश फुंडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्त होता.