शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

भाजपचे बाळा काशीवार विजयी

By admin | Updated: October 19, 2014 23:17 IST

साकोली विधानसभेच्या मतमोजणीत भाजपचे राजेश (बाळा) काशीवार यांनी काँग्रेसचे सेवक वाघाये यांचा २५ हजार ४८९ मतांनी पराभव करीत पुन्हा एकदा साकोली विधानसभेवर भाजपाचा झेंडा रोवला.

साकोली : साकोली विधानसभेच्या मतमोजणीत भाजपचे राजेश (बाळा) काशीवार यांनी काँग्रेसचे सेवक वाघाये यांचा २५ हजार ४८९ मतांनी पराभव करीत पुन्हा एकदा साकोली विधानसभेवर भाजपाचा झेंडा रोवला.साकोली विधानसभेसाठी यावेळी २१ उमेदवार रिंगणात होते. दि. १५ ला मतदान घेण्यात आले होते. आज सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यात भाजपचे राजेश ८० हजार ९०२, शिवसेनाचे डॉ.प्रशांत पडोळे २ हजार १५१, राष्ट्रवादीचे सुनील फुंडे १९ हजार ८८८, बसपाचे डॉ. महेंद्र गणवीर ३१ हजार ६४९, काँग्रेसचे सेवक वाघाये ५५ हजार ४१३, अचल मेश्राम ६९५, अ‍ॅड. व्यंकटराव बोरकर ५३७, डॉ.अजय तुमसरे ११ हजार ८६४, रमेश खेडीकर २६२, किशोर खेडीकर १८८, तुळशीराम गायधने ६५७, रामकृष्ण ठेंगडी ५०४, अ‍ॅड.धनंजय राजाभोज ३२२, के.एन. नान्हे ८६४, तु.रा. भुसारी २ हजार ३१६, स्वर्णलता माकोडे १ हजार १२९, ज्ञानेशकुमार लिचडे २,१०४, शेषराव गिऱ्हेपुंजे १ हजार ८०५, बिसन सयाम २,७८४, सुनिता हुमे १ हजार ३०२, प्रभू हटवार ८९५ मते मिळाली. यात भाजपाचे राजेश काशीवार हे २५, ४८९ मतांनी विजयी झाले. आज सकाळपासूनच सेंदूरवाफा येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. यात सुरुवातीचे चार फेऱ्यात सेवक वाघाये हे समोर होते. मात्र पाचव्या फेरीनंतर भाजपाचे काशीवार हे समोर झाले. या चुरशीच्या लढतीत काशीवार अखेरपर्यंत समोरच राहिले. मतमोजणी केंद्राच्या बाहेर सकाळपासूनच कार्यकर्ते फटाके फोडत होते. (तालुका प्रतिनिधी)