शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

भाजपाने हलबांचा विश्वासघात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 10:29 PM

भाजपा नेत्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेऊन २०-२२ आमदार हलबा बांधवांनी निवडून दिले. भाजपा सत्तेवर आल्यावर संविधानाचा सन्मान करण्याऐवजी हलबांचा विश्वासघात करीत आहे.

ठळक मुद्देनंदा पराते : आदिम हलबा कर्मचारी, अधिकारी यांचा मेळावा

आॅनलाईन लोकमतभंडारा : भाजपा नेत्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेऊन २०-२२ आमदार हलबा बांधवांनी निवडून दिले. भाजपा सत्तेवर आल्यावर संविधानाचा सन्मान करण्याऐवजी हलबांचा विश्वासघात करीत आहे. उच्च न्यायालयाने कोष्टी व्यवसाय हलबांचा मान्य करून वैधता प्रमाणपत्र दिले. कोष्टी हा हलबांचा धंदा असल्याचा इतिहास हायकोर्टात मान्य झाला. जाती दाखले बोगस ठरविल्यावर हायकोर्टाने नोकरीला संरक्षण दिले. या हायकोर्टाच्या निर्णयाविरूद्ध भाजप सरकार सुप्रीम कोर्टात जाऊन हलबांचा विश्वासघात केल्याचा आरोप आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. नंदा पराते केला.राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने कर्मचारी व अधिकारी यांचा मेळावा भंडारा येथे पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला मनोहर हेडाऊ, धनंजय धापोडकर, ओमप्रकाश पाठराबे, मनोहर घोराडकर, देवराव निमजे, अनिल पराते, आशिष पराते, नितिन धकाते आदी उपस्थित होते.यावेळी नंदा पराते यांनी, संविधानानुसार आदिवासी, दलित, ओबीसी यांना आरक्षण मिळाले आहे. तसेच हलबा, हलबी जमातीच्या घटना यादीमध्ये समावेश केला आहे. सरकारच्या सक्षम अधिकाºयांनी लाखो जाती दाखले मागासवर्गीयांना दिलेत, संविधान यादीत समावेश असलेल्या जाती, जमातींना आरक्षणाचे लाभ देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. संविधान यादीतील हलबा, हलबी या जमातींना हिंदू धर्माच्या नावाखाली आणि कोष्टी धंद्याच्या नावाने अन्याय होवू देणार नाही, असे भाजपा नेत्यांनी निवडणुकीपूर्वी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यास तीन महिन्यात जीआर काढू, हलबा अधिकाºयाने दिलेले जाती दाखले खोटे होवू शकत नसताना षडयंत्र झाले. भाजपा सत्तेवर येवून तीन वर्षे झाली तरी कोष्टी व्यवसाय करणारे विदर्भातील हलबा संबंधी अजुनपर्यंत जीआर काढला नाही. भाजपा सत्तेवर येवून तीन वर्षे झाले तरी कोष्टी व्यवसाय करणारे विदर्भातील हलबा संबंधी अजूनपर्यंत जीआर काढला नाही. विदर्भात यामुळे भाजपा सरकार विरोधात आक्रोश वाढत असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोरेश्वर निनावे, वामन खोत, दुधाराम बारापत्रे, जयंत सोनकुसरे, ताराचंद्र निमजे, रामधन धकाते, शारदा बोकडे, श्रीराम निमजे, रेखा दलाल, योगिता निमजे, गिरधारी पराते, शिवा हेडाऊ, आशिष तईकर, जगदिश निमजे, गंगाधर पात्रे आदींनी सहकार्य केले.