शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

जन्मदात्याला आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:44 IST

अपत्य मुलगा न होता मुलगी जन्माला आली या द्वेष भावनेने १८ महिन्याच्या मुलीचा गळा दाबून जन्मदात्या वडीलानेच खून केला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पाण्डे यांनी शनिवारी आरोपी डाकराम पंढरी घोरमोडे याला आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ही घटना अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गोसेबुज येथे १ सप्टेंबर २०१६ रोजी घडली.

ठळक मुद्देभंडारा न्यायालयाचा निर्णय : १८ महिन्यांच्या मुलीचा गळा आवळून खून, प्रकरण गोसे येथील

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपत्य मुलगा न होता मुलगी जन्माला आली या द्वेष भावनेने १८ महिन्याच्या मुलीचा गळा दाबून जन्मदात्या वडीलानेच खून केला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पाण्डे यांनी शनिवारी आरोपी डाकराम पंढरी घोरमोडे याला आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ही घटना अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गोसेबुज येथे १ सप्टेंबर २०१६ रोजी घडली.माहितीनुसार, गोसे येथील रहिवासी असलेल्या डाकराम घोरमोडे याचे लग्न मनिषा याचे सोबत सन २०१४ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे झाले. संयुक्त कुटूंब असले तरी पती डाकरामकडून मनिषा हिला त्रास सहन करावा लागत होता. प्रसुतीकरिता मनिषा हिला रामटेक तालुक्यातील बोरडा येथे तिच्या माहेरी पाठविण्यात आले होते. १५ जून २०१५ रोजी मनिषा हिने कन्येला जन्म दिला. याची बातमी पती डाकराम याला मिळाली. मुलगी झाल्याचा आनंद न होता, कुटूंबीयात नाराजी व्यक्त करुन डाकराम व त्याचे कुटूंबीय मनिषा व नवजात बाळालाही पाहण्यासाठी गेले नाही. मुलगी १८ महिन्यांची होवूनसुध्दा डाकराम याने मनिषा पत्नी व मुलीला स्वत:चा घरी आणले नाही.यादरम्यान कुटूंबीयातील वरिष्ठ व्यक्तिंनी मध्यस्थी करुन मनिषा व १८ महिन्याच्या मुलीला ९ आॅगस्ट २०१६ रोजी गोसे येथे आणले. परंतु अपत्य म्हणून मुलगा न होता मुलगी झाली, याबाबतचा राग डाकरामने मनात ठेवून पोटच्या मुलीसोबत क्रुरपणे वागणूक देत होता. यावरुन मनिषा हिचा नेहमीच तिरस्कार केला जात होता.घटनेच्या दिवशी १ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मनिषा ही पाणी भरण्याकरिता बाहेर गेली असता. पलंगावर झोपलेल्या १८ महिन्याच्या मुलीचा डाकरामने गळा आवळला.गुंड घेवून परत येत असता डाकराम हा मुलीचा गळा दाबताना दिसताच तिने मुलीकडे धाव घेतली. शक्य असेल तितक्या लवकर मुलीला बाहेर घेवून आली. मुलीचा शरीर थंडगार होवून जीभ बाहेर आल्यासारखी दिसली. यावेळी उपचारार्थ मुलीला नेण्यात आले. यावेळी जबरदस्तीने मनिषा हिला ही दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी मनिषा हिला दवाखान्यात ठेवून मुलीला परत गोसे येथे आणण्यात आले. यावेळी मनिषाने, माझी मुलगी मरण पावल्याची शंका आल्याने याची सुचना माहेरी दिली. या दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट होताच मनिषाचा मनावर मोठा आघात झाला. १ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.डाकराम घोरमोडे यानेच मुलीचा गळा दाबून खुन केला याबाबतची तक्रार मनिषा हिने ३ सप्टेंबर रोजी अड्याळ पोलीस ठाण्यात नोंदविली. तक्रारीवरुन घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू यांनी घटनेचा तपास तत्कालीन ठाणेदार अजाबराव नेवारे यांच्याकडे सोपविला. यावेळी पुन्हा मृत मुलीचा मृतदेह जमिनीतून काढून शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालातून मुलीचा गळा आवळल्यानेच तिचा मृत्यू झाला. अशा अहवाल सादर करण्यात आला. सदर प्रकरण भंडारा जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले. साक्ष, पुरावा व सबळ पुरावे मिळून आल्याने व त्याबाबतचा आरोप सिध्द झाल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पाण्डे यांनी आरोपी डाकराम पंढरी घोरमोडे याला कलम ३०२ भांदवी अंतर्गत आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.तसेच सहा हजार रुपये दंडाची शिक्षाही ठोठावली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. दुर्गा तलमले यांनी बाजु मांडली. सदर गुन्ह्यात पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार काशीराम मस्के यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.