उपस्थितांचे मार्गदर्शन : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतही कार्यक्रमभंडारा : राजमाता, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची २९१ वी जयंती जिल्हा परिषदेच्या सभागृहात काल (मंगळवारी) साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) आर.जे. धांडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. डी.एस. केदार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.बी. शहारे, कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे विभाग) पी.स. पराते आदी अधिकारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाची सुरूवात मातोश्री अहल्यादेवी होळकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विभागाचे अधीक्षक राजन पडारे यांनी करून मातोश्री अहल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर कार्यावर प्रकाश टाकला.यावेळी नलिनी डोंगरे, के.आर. खोब्रागडे, एस.आर. निशाने, ए.के. नौकरीया, आर.बी. मडकाम, आर.जी. पडो, व्ही.जी. पटले, व्ही.एस. जेमती, व्ही.एस. विघे, एन.यु. गावंडे, एस.पी. धाबेकर, एच.एम. तिडके, एस.एन. पवार, एस.एन. पवनकर, आर.व्ही. राठोड, वनिता सार्वे, शुभांगी निखाडे, वसंत सार्वे, मनिष वाहने, एस.एम. चोपकर, डी.आय. नागदेवे, श्रीहरी बावने, लेकुळे उपस्थित होते. उसर्रा : महिलांनी कर्तबगार बनून येणाऱ्या कोणत्याही प्रश्नांना तोंड देत रहावे असे अहल्यादेवी होळकर यांचे मत होते. त्यामुळे आता अहल्यादेवींच्या विचाराची जगाला गरज असल्याचे प्रतिपादन लागवड अधिकारी आर.एस. दवंडे यांनी केले.सामाजिक वनिकरण विभाग मोहाडीच्या वतीने पुण्यश्लोक देवी अहल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लागवड अधिकारी आर.एस. दवंडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक लागवड अधिकारी जे.पी. उईके, मुन्ना मेश्राम, पारसमनी उके, हितेश साठवणे, मधुकर जिभकाटे, महेश बुरवादे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आर.एस. दवंडे म्हणाले की, अहल्याबाई होळकरांनी अनेक धार्मिक स्थळाची उभारणी करून जनजागृतीचे काम केले. आजच्या तरूण पिढीने स्वाभिमान कायम ठेवून अहल्याबाईचे अनुकरण करावा. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी वनमजूर व कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार उईके यांनी मानले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 02:23 IST