शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

पक्षीदिनी आढळले ६२ प्रकारचे १५६५ पेक्षा जास्त पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 22:14 IST

येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयातील जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब राष्ट्रीय हरित सेना तर्फे साकोली शहरात लागोपाठ १८ व्या वर्षी डॉ. सलीम अली यांच्या जयंती निमित्ताने पक्षी दिन कार्यक्रम.....

ठळक मुद्दे१८ व्या वर्षी पक्षीगणना : ग्लोबल नेचर क्लबचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयातील जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब राष्ट्रीय हरित सेना तर्फे साकोली शहरात लागोपाठ १८ व्या वर्षी डॉ. सलीम अली यांच्या जयंती निमित्ताने पक्षी दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.पक्षी दिंन कार्यक्रमात संस्था सचिव विद्या कटकवार हे अध्यक्षस्थानी होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नागझिरा अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक आर. आर. सदगिर, प्राचार्य व्ही.एम. देवगिरकर, ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा. अशोक गायधने, प्रा. आर. के. भालेराव, क्रीडा शिक्षक शाहीद कुरेशी, पुष्पा बोरकर, येळेकर, शिक्षिका व प्रा. शीतल साहू हे होते. सहाय्यक वनसंरक्षक आर.आर. सदगिर यांनी पक्षी गणनेद्वारे प्रकारे निसर्ग संवर्धनाचे बालपणापासून पक्षी निरीक्षणाची सवय लावावी असे आवाहन केले.तत्पूर्वी सकाळी ८ वाजता कटकवार विद्यालय शालेय परिसरात आलेल्या ६० नेचर क्लब सदस्यांचे चार दुर्मिळ पक्ष्यानचे नाव असलेल्या गटांमध्ये विभागनी करण्यात आली. प्रा. अशोक गायधने यांच्या मार्गदर्शनाखाली तणमोर गटाने पश्चिम साकोली व शालेय नवतळा परिसरात सकाळी ८ ते ९.३० या वेळात पक्षी निरीक्षण व पक्षीगणना करून ३४ प्रकारचे ६२५ पेक्षा जास्त पक्षी या गटाला आढळले. पक्षी अहवाल गटप्रमुख महेश गिºहेपुंजे याने टाळ्याच्या गजरात सादर केला. पक्षी अभ्यासक दुलीचंद सोनवाने यांच्या मार्गदर्शनाखाली माळढोक पक्षी गटाने गडकुंभली व गडकुंभली रोड परिसरात अर्थात दक्षिण साकोली परिसरात २९ प्रकारचे ५०० पेक्षा जास्त पक्ष्यांची गणना केली. पूर्व साकोली व नर्सरी कॉलनी तसेच पहाडी परिसरात निसर्ग अभ्यासक कैलाश वलथरे व शुभम बघेल यांच्या मार्गदर्शनाखाली किंगफिशर पक्षीगटाला १० प्रकारचे पक्षी व १३८ पक्षीसंख्या आढळली. उत्तर साकोली व जमनापूर परिसरात निसर्गमित्र कमलेश टोपले, युवराज बोबडे, हर्ष कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली सारस पक्षीगटाला ४० प्रकारचे ३०० पेक्षा जास्त पक्षी आढळले. पक्षी अहवाल आर्यन टेंभुर्णे याने तर किंगफिशर गटाचा अहवाल भाग्यश्री कांबळे हिने टाळ्यांच्या गजरात वाचला. अशाप्रकारे चरही पक्षीगटाना ६२ प्रकारचे १५६५ पक्षी या दोन तासाच्या पक्षीगणनेत आढळले. साकोली शहरात करण्यात आलेल्या सलीम अली जयंती पक्षीदिन कार्यक्रमाचा अहवाल बी.एन.एच.एस. मुंबई चे नंदकिशोर दुधे व महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थांचे डॉ.जयंत वडतकर यांचेकडे पाठविण्यात आला. संचालन महेश गिºहेपुंजे व चैतन्य कटरे यांनी तर आभार आर्यन टेंभुर्णे याने मानले.ग्लोबल नेचर क्लबतर्फे घेण्यात आलेल्या पक्षीदिन कार्यक्रमाला संस्थासचिव विद्या कटकवार, प्राचार्य विजय देवगिरकर, प्रा.संजय पारधी, प्रा.के.पी. बिसेन, पुष्पा बोरकर, प्रा.शीतल शाहू, बी.एन. मांदाडे, जागेश्वर तिडके, दुलीचंद सोनवाने, कैलाश वलथरे, आर्यन टेंभुर्णे, शुभम बघेल, कमलेश टोपले, युवराज बोबडे, हर्ष कापगते, योगराज राजगिरे, दिव्या राखडे, रामदास शहारे यांनी सहकार्य केले.