शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जागेवर उभारली स्मार्ट बाजारची भली मोठी इमारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:34 IST

गावठाण जागा दाखविली खासगी: नगर परिषद, महसूल अधिकाऱ्यांची डोळेझाक

राहुल भुतांगे लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : येथील विनोबा भावे नगरातील भंडारा रोडवरील (गावठाण) सरकारी जागेची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावून ती खासगी जागा दर्शवून त्यावर टोलेजंग स्मार्ट बाजारची इमारत बांधण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तुमसर-भंडारा रोडवरील सदर जागेचे जुने खसरा क्र. ११०० असून त्याकरिता बनविण्यात आलेली बोगस आखीव पत्रिका ३२३१ च्या सिरीजमधील ही जागा आहे. सन १९७२ मध्ये भूमी अभिलेख विभाग अस्तित्वात आल्यानंतर ही जागा नझूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. या जागेकरिता नझूल विभागाद्वारे मूळ मालकाचा उल्लेख न करता 'गायरान' या शेऱ्यासह आखीव पत्रिका तयार करण्यात आली. नंतर, ३१ वर्षांनंतर तलाठ्याने कुणाच्या आदेशाने वारसदार म्हणून फेरफार घेतला व ही शासकीय जागा खासगी असल्याचे दर्शविले, यावर प्रश्नचिन्ह आहे. 

महाराष्ट्र भूराजस्व संहिता १९५४ च्या कलम २३३ ते २३७ प्रमाणे गावठाण म्हणून घोषित करण्यात आलेली जागा ही तुमसर गावठाण नकाशामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तुमसरकरांची आहे. या संबंधी उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांना भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. 

उपविभागीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष सदर जागा ही गावठाणची सरकारी असल्याने ती नगर पालिकेच्या ताब्यात घेण्याकरिता प्राप्त तक्रारीवर ३ मार्च २०२३ व २७ जुलै २०२३ ला उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रीपती मोरे यांच्या सहीनिशी उपविभागीय अधिकारी तुमसर यांना, संबंधित प्रकरणी नियमानुसार चौकशी करून कारवाई करावी आणि अहवाल सादर करावा, असे पत्र दिले होते. मात्र संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नसल्याने आज स्मार्ट बाजारची इमारत उभी झाली आहे. मध्य प्रदेश जमीनदारी उन्मुलन कायदा १९५० व महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ च्या कलम १२२ अंतर्गत शासनाद्वारे संपादन करण्यात आलेली गायरान/गावठाण व आबादीकरता निश्चित होती, मात्र या नियमाचे उल्लंघन झाल्याचे येथे दिसत आहे.

"गावठाणची जागा ही सरकार मालकीची असते. सदर जागा नगर परिषदेच्या ताब्यात येत असून, त्यांना या प्रकरणी संबंधितावर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात येईल."- मोहन टिकले, तहसीलदार, तुमसर 

टॅग्स :bhandara-acभंडारा