शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

बिडी कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 10, 2016 00:44 IST

स्थानिक विदर्भ बिडी लि. कंपनीच्या बिडी कामगारांना येत्या आठ वर्षापासून न्याय मिळालेला नाही.

दमानिया करणार नेतृत्व : १२ जानेवारीला महिला कामगारांशी संवाद साधणारलाखनी : स्थानिक विदर्भ बिडी लि. कंपनीच्या बिडी कामगारांना येत्या आठ वर्षापासून न्याय मिळालेला नाही. बेकायदेशीर टाळेबंद करुन कंपनी प्रशासनाने हेतुपुरस्पर कामगारांना बेरोजगार बनविले. किमानदोन वेळचे जेवन समाधानाने मिळावे आणि सरकारने निर्धारित केलेल्या नियमानुसार किमान वेतन मिळावे अशी मागणी करताच अशिक्षीत व गरीब कामगारांविरुध्द षड्यंत्र रचण्यात आले. ज्यांचे पोटपाणी बिडी व्यवसायावर अवलंबुन आहे ते कंपनी बंद पाडण्याचा विचार करणार नाही असे पत्रकार परिषदेत सचिन अंबादे यांनी सांगितले.बिडी व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या महिलांचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया करित आहेत. १२ जानेवारीला स्थानिक श्रीराम मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता विदर्भ बिडी कंपनीच्या अन्यायग्रस्त मजुराना कायदेशिर व अन्य शक्य त्या मार्गाने लवकरात लवकर न्याय कसा मिळवुन देता येईल. याकरिता मजुरांशी चर्चा करणार आहेत. व कायदेशीर लढाई लढणार आहेत.विदर्भ बिडी कंपनीच्या कामगारांवर वेगवेगळे आरोप करुन छळ केला आहे. त्या निष्पाप कामगाराविरुध्द कंपनी प्रशासनाने अपप्रचार केला. काही प्रसिध्द व्यक्तींनी न्याय मिळवून देतो म्हणून आपले खिसे भरुन घेतले. कपंनीने आठ वर्षे बंद कालावधीतील मोबदला म्हणून १५ ते २० हजार रुपये देण्याचे आमिष दिले आहे व राजिनामा मागितला आहे. काही कामगारांना कमी रक्कम दाखविली आहे.कामगारांच्या न्याय हक्कासाठी बनलेल्या युनियनच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी कामगारांना विश्वासात न घेता कंपनी प्रशासनाशी समझोता केला आहे. बिडी कामगारांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतेही राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी यांनी प्रयत्न केलेला नाही. अंजली दमानिया अन्यायग्रस्त, निराधार व गरीब कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सर्व बिडी कामगारांनी संघटित होण्याचे आवाहन सचिन अंबादे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)