तुमसर : नगर परिषद तुमसरद्वारा शरीरातील विविध प्रभागातील विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.
स्वच्छ महाराष्ट्र योजना विशेष रस्ता अनुदान,, चौदावा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना, वैशिष्ट्य पूर्ण योजना, विशेष रस्ता अनुदान, अंतर्गत सदर कामे करण्यात येत आहे व काही कामाचे लोकार्पण ही करण्यात आले. तुमसरातील विविध प्रभागातील सदर कामाच्या ठिकाणी भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.
सदर भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन विधानपरिषद सदस्य आमदार परिणय फुके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजू कारेमोरे हे होते तर विशेष अतिथी म्हणून तुमसर नगर परिषदेचे अध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे, उपाध्यक्षा गीता कोंडेवार, विरोधी पक्षनेते तथा माजी नगराध्यक्ष अमर रगडे, सभापती सचिन बोपचे, मेहताब ठाकूर, अर्चना भुरे, शीला डोये, किरणदेवी जोशी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रभाग क्र. ६ येथे १४ वे वित्त आयोग निधी अंतर्गत कत्तलखाना बांधकामाच्या लोकार्पणाने करण्यात आली. त्यानंतर प्रभाग क्रमांक २ मध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजने अंतर्गत स्वातंत्र संग्राम स्व. नारायण फकिराजी चौधरी बालोद्यानाचे व प्रभाग क्र. २ दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत संत चोखामेळा समाजभवनाचे तसेच प्रभाग क्र. २ येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मुस्लीम कब्रस्तान समाज भवनाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर प्रभाग क्र. ८ येथे नागरी दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत फिल्टर प्लांट ते राजीव गांधी पुतळ्यापर्यंत दोन्ही बाजूने पेव्हिंग ब्लॉक लावणे, प्रभाग क्र. १०-११ येथे विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत शरद बंडावार यांचे घरापासून ते चौधरी यांचे घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, व स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेअंतर्गत शिव मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण या कामाचे भूमिपूजनदेखील करण्यात आले. यावेळी आमदार परिणय फुके व आमदार राजू कारेमोरे यांनी विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजनाबाबत आनंद व्यक्त केला. शासनाने मोठी शहरे, गावांचा विकास करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. तुमसर नगरपालिकेने विकासकामांचा जो धडाका लावला आहे ही तुमसरकरासाठी आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे. भविष्यातही तुमसरचा विकास कसा करता येईल, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार, असे प्रतिपादनही केले. यावेळी न.प. सदस्य किशोर भवसागर, विद्या फुलेकर, छाया मलेवार, सुनील पारधी, रजनीश लांजेवार, पंकज बालपांडे, वर्षा लांजेवार, श्याम धुर्वे, कंचन कोडवानी, भारती धार्मिक, कैलाश पडोळे, खुशलता भवसागर, तारा गाणे, नगरसेविका, राजू गायधने, प्रमोद घरडे, सलाम तूरक, नगरसेवक, राजेश ठाकुर, स्मिता बोरकर, कल्याणी भुरे,आशिष कुकडे, मुन्ना पुंडे, शोभा लांजेवार, अन्नू रोचवानी, योगेश रंगवानी, स्वप्नील मन गटे, राकेश बोकडे, आदी नागरिक उपस्थित होते.