शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

भिमलकसा प्रकल्पामुळे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:17 IST

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा भिमलकसा प्रकल्प लोकप्रतिनिधी व अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे रखडलेला होता. या प्रकल्पाचा आधार घेऊन अनेक लोक प्रतिनिधी फक्त मते पदरात पाडून घेतली.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : तब्बल ४५ वर्षानंतर झाले भिमलकसा प्रकल्पाचे भूमिपूजन, तर १०७१ हेक्टर शेतीत सिंचनाचा लाभ

आॅनलाईन लोकमतसाकोली : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा भिमलकसा प्रकल्प लोकप्रतिनिधी व अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे रखडलेला होता. या प्रकल्पाचा आधार घेऊन अनेक लोक प्रतिनिधी फक्त मते पदरात पाडून घेतली. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम करण्यास त्यांची मानसिकताच नव्हती. मात्र आ. बाळा काशिवार यांनी सातत्याने सतत प्रयत्न करुन हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे एक हजार ७१ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार असून परिसरात हरितक्रांती घडणार आहे, असे मत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.साकोली तालुक्यातील वडेगाव येथील भिमलकसा प्रकल्पाच्या भुमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. बाळा काशिवार, सभापती रेखा वासनिक, नगराध्यक्ष धनवंता राऊत, सभापती उषाताई डोंगरवार, भाजपा तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, मंदा गणवीर, उपसभापती वर्षा कापगते, सरपंच भिमावती पटले, सरपंच ज्योती वघारे, उपसरपंच धर्मराज भलावी, माजी सरपंच जयनाथ रहांगडाले, चुन्नीलाल वासनिक, माजी सभापती गिताताई कापगते, दादा टिचकुले, प्रकाश बाळबुध्दे, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार अरविंद हिंगे या प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी चोपडे उपस्थित होते.ना. बावनकुळे पुढे म्हणाले की, भिमलकसा प्रकल्पाचे कामाला १९७२ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र वनकायद्याच्या अडचणीमुळे हा प्रकल्प बंद करण्यात आला. तेव्हापासून या प्रकल्पाकडे कुणीही लक्ष दिले नाही. तेव्हाच या प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यात आले असते. शासनाचा निधीही कामी लागला असता व या प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग शतीकरिता झाला असता.यावर्षी उीपीडीसी अंतर्गत भंडारा जिल्ह्याला १४० कोटी रुपयाचा निधी मिळाला आहे. पुढच्यावर्षी १७५ कोटी रुपयाची मागणी आपण करणार असून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात हा निधी वापरण्यात येणारआहे.याशिवाय यावर्षीपासून शासनाच्या नविन योजनांना सुरुवात होणार आहे. यात ज्याची घरे ५०० फुट जागेत बांधली आहेत त्यांना शासनातर्फे मोफत पट्टे देणार आहे. ज्या जमिनी वर्ग २ मधून १ मध्ये आणावयाची आहेत. त्यांना कुठल्याही कागदपत्राची पुर्तता करायची नाही व बांधकाम मजुरांना दरवर्षी ६० रुपये भरुन शासनाच्या १८ योजनांचा लाभ मिळणार आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.सिंचनाला प्राधान्य : बाळा काशीवार१९७२ पासून रखडलेल्या भिमलकसा प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. यापूर्वी अनेकांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभुल केली. या प्रकल्पाचे काम वेळेत पुर्ण करण्याचा प्रयास असुन या प्रकल्पावरुन सात गावातील एक हजार ७१ हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होणार आहे. फडणवीस सरकारचे सिंचनावर अधिक भर दिला आहे. यात शेततळे, प्रकल्प, यासारख्या विविध उपक्रमाचा समावेश आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी.नाना पटोलेंना लगावला टोलाना.बावनकुळे यांनी वडेगाव येथे सभा सुरु होती. या सभेदरम्यान ना. बावनकुळे म्हणाले की, निवडणुका या पाच वर्षाकरिता असतात. मात्र काही जन काहीच काम करीत नाही. काम करण्याची त्याची प्रबळ इच्छा नसते. मात्र एक दुसºयावर आरोप प्रत्यारोप करुन कामे न करताच राजीनामे देतात. राजीनामा दयायचाच होता तर निवडणूक कशाला लढवितात व जनतेची दिशाभूल कशी काय करतात,असा टोलाही अप्रत्यक्षरित्या नाना पटोले यांना लावला.वडेगावसाठी २५ लक्षभिमलकसा प्रकल्पाच्या भुमिपूजनाप्रसंगी आयोजित सभेत ना. बावनकुळे यांनी वडेगावतील विकास कामाकरिता २५ लक्ष रुपये मंजूर करण्याचे आश्वासन दिले. यात रस्ते, लाईट यासह विविध कामाचा समावेश करण्यात येणार आहे.लोकांची गर्दीबहुप्रतिष्ठित भिमलकसा प्रकल्पाचे भूमिपूजन होणार म्हणून परिसरातील लोकांत एकच उत्सुकता होती. हा सोहळा पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. यानंतर गावात सभा झाली. त्यावेळीही लोकांची गर्दी होती. या कार्यक्रमाला नितीन खेडीकर, किशोर पोगडे, बंडू शेंडे, चंद्रकात वडीचार, नगरसेवक सुभाष बागडे, उपाध्यक्ष तरुण मल्लानी, भगवान पटले, आनंद सोनवाने, अमोल हलमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. संचालन गिता कापगते यांनी तर आभार लखन बर्वे यांनी केले.