शहिदांना मानवंदना : गावागावांतून काढली रॅली, बौध्द बांधवांची उपस्थितीभंडारा : भीमा नदीचे तीरावर कोरेगाव येथील लढाईत शहीद झालेल्या शुरविरांना मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगाव शौय दिवस अभियान कृती समिती भंडाराच्या वतीने गावोगावी पत्रके वाटुन अभियान राबविण्यात आले. तालुका मुख्यालय लाखनी, साकोली, लाखांदुर, पवनी, तुमसर, मोहाडी आणि पेट्रोलपंप (ठाणा) आदी ठिकाणी बुध्द विहारामध्ये मानवंदना कार्यक्रम तुलसीराम गेडाम यांचे नेतृत्वाखाली रॅली काढून घेण्यात आली. आणि त्या अभियानाचा मुख्य समारोपीय कार्यक्रम भंडारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात राजविलास गजभिये यांचे अध्यक्षतेखाली रविवारला संपन्न झाला. यावेळी विशेष अतिथी म्हणून भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार रामचंद्र अवसरे हे लाभले. सदर समारोपीय कार्यक्रमास बौध्द समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे पुतळ्यास अतिथीच्या हस्ते पुष्पांजली वाहून, दीप प्रज्वलित करुन व सामुहिक बुध्द वंदना घेवुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. भीमा कोरेगांव शौर्य दिवसाचे संदर्भात हर्षल मेश्राम, वामन मेश्राम, अमृत बन्सोड, दादासाहेब कोचे, भिमशंकर गजभिये, तुलसिराम गेडाम यांची भाषणे झालीत. त्यामध्ये त्यांनी कोरेगावची लढाई ही इंग्रज विरुध्द पेशवे ह्यांची लढाई होती. ती का व कशी, लढाईची पाश्वभुमी आणि संपुर्ण वर्णन भाषणातुन सांगितले. विशेष गोष्ट म्हणजे ५०० महार शुर सैनिक हे परकीय म्हणजेय इंग्रजाच्या बाजुने का लढले हे प्रामुख्याने समजावुन दिले आणि भीमा कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून इंग्रजांना विजय प्राप्त करुन दिले त्या आपल्या शुर पुर्वजापासुन प्रेरणा घेऊन सामाजिक लढाई जिंकण्यासाठी एकसंघ राहुन सतत जागृत राहण्याचे समाजाला आवाहन केले.विशेष अतिथी आमदार अवसरे यांनी कोरगावची लढाई ही इंग्रज आणि पेशव्यात झाली हे खरे असले तरी दुसऱ्या बाजुने ती मान-आपमानाची लढाई होती, असे प्रतिपादन केले. विकास राऊत, कुंदा गजभिये, रिना माटे, संघपाल तिरपुडे, घनश्याम राऊत, सागर गजभिये, ताराचंद मेश्राम, विलास नंदागवळी, सीमा बन्सोड, सुषमा धारगावे, पुष्पा मेश्राम, संगिता मडामे, हितेंद्र नागदेवे, मायाबाई रामटेके, मुलचंद मेश्राम, भजनदास मेश्राम, सिदार्थ मेश्राम, सुभाष रामटेके, मोरेश्वर गजभिये, सारिका उके यांनी अभियान राबविण्यासाठी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
भीमा कोरेगाव शौर्य दिवस अभियान
By admin | Updated: January 12, 2016 00:39 IST