शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Bhandara: धानाचे पोते घेऊन येणारा ट्रक उलटला, राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा ट्रकचा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 15:59 IST

Bhandara Accident News: मध्य प्रदेशातून धानाचे पोते घेऊन येणाऱ्या ट्रकला अन्य दुसऱ्या ट्रकने कट मारल्याने ट्रक चालकांचे नियंत्रण सुटले. यात धानाचे पोती घेऊन येणारा ट्रक राष्ट्रीय महामार्गावरील बिनाखी गावांचे शेजारी उलटला.

- देवानंद नंदेश्वर भंडारा - मध्य प्रदेशातून धानाचे पोते घेऊन येणाऱ्या ट्रकला अन्य दुसऱ्या ट्रकने कट मारल्याने ट्रक चालकांचे नियंत्रण सुटले. यात धानाचे पोती घेऊन येणारा ट्रक राष्ट्रीय महामार्गावरील बिनाखी गावांचे शेजारी उलटला. ही घटना रविवारी पहाटे ५ वाजता घडली आहे. धानाचे प्रचंड नुकसान झाले. ट्रक चालक शुभम पाचे (२३) रा. रजेगाव ( मध्यप्रदेश ) असे जखमीचे नाव आहे.

भंडारा - बालाघाट या १०० किमी अंतरच्या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले आहे. तीन टप्प्यात घोषित करण्यात आलेल्या महामार्गाची वर्षभरापूर्वी झाली आहे. परंतु प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्यात आली नाही. याउलट नाकाडोंगरी राज्य मार्गावरील जड वाहतूक सिहोरा परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वळते करण्यात आली आहे. अरुंद असणाऱ्या महामार्गावर जड वाहतूक वळते करण्यात आल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. भरधाव वेगाने वाहने धावत असल्याने अपघात वाढले आहेत. यात अनेकांनी जीव गमावला आहे.

चारचाकी, दुचाकी वाहनांच्या अपघाताचे वाढत्या घटना घडल्या आहेत. मध्यप्रदेशातील घनसोर येथून धानाचे पोते घेऊन येणाऱ्या ट्रक क्रमांक सीजी ०६ जीपी ०८०५ ला राष्ट्रीय महामार्गावरील बिनाखी गावांचे शेजारी या ट्रकला रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या अन्य दुसऱ्या ट्रकने कट मारली असता धानाचे पोते घेऊन येणाऱ्या ट्रक चालक शुभम पाचे यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. महामार्गाचे कडेला ट्रक उलटल्याने धानाच्या पोत्याची नासाडी झाली. नाल्यात धानाचे पोते अस्तव्यस्त असल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. पहाटे ट्रकचा अपघात झाला असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे. ट्रकमध्ये धानाचे पोते किती होते. यासंदर्भात माहिती मिळाली नाही. दरम्यान घटनेची नोंद सिहोरा पोलिस ठाण्यात करण्यात आली नाही.

टॅग्स :Accidentअपघात