शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

भंडारा रोड रेल्वेस्थानक समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

भंडारा रोड रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला वरठी गाव वसलेले आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. यापैकी प्रवाशांना सर्वाधिक उपयोगी ठरणारा रस्ता भंडारा ते वरठी असून हाच मार्ग प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. हा मार्ग उखडलेला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देनवीन गाड्या वाढविण्याची गरज : प्रवाशांना रेल्वेच्या अनियमिततेचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळातील भंडारा रोड स्थानक जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वात सोयीस्कर आहे. मात्र या रेल्वे स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे.भंडारा रोड रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला वरठी गाव वसलेले आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. यापैकी प्रवाशांना सर्वाधिक उपयोगी ठरणारा रस्ता भंडारा ते वरठी असून हाच मार्ग प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. हा मार्ग उखडलेला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. भंडारा बसस्थानकापासून रेल्वे स्टेशनपर्यत वेळेवर पोहोचणे प्रवाशांना अनेकदा शक्य होत नाही. याच मार्गाने ऑटोरिक्षा वेगाने धावत असतात. इतर वाहनांची देखील मोठी वर्दळ असते. मोठ्या खड्यांंमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक व्यावसायीकांनी आपली दुकाने रस्त्यावरच थाटली आहे. अरुंद रसत्यामुळे रेल्वे येते तेव्हा प्रवाशांची गर्दी आणि अरुंद रस्त्यामुळे फलाटापर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होते. अनेकदा मोठी धावपळ करावी लागते.पावसाळ्याच्या दिवसात येथे पाणी साचलेले असते. त्यातूनच मार्ग शोधावा लागतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी रेल्वे विभाग किंवा स्थानिक ग्रामपंचायतने कुठलेच प्रयत्न केलेले दिसत नाहीत.वरठी रेल्वेस्थानक ते भंडारा बस बसस्थानकापर्यंत धावधाऱ्या ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेपक्षा आधिक प्रवासी बसविले जातात. त्यांचा वेगही अधिका असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही ऑटोरिक्षा चालक प्रवाशांशी हुज्जत घालत असतात. परंतु याकडे पोलीस आणि रेल्वे विभागाचे कायमच दुर्लक्ष दिसून येते. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा रेल्वेगाड्या नियमित येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. रेल्वेस्थानक परिसरात अस्ताव्यस्त लागणाºया वाहनांच्या रांगा याचा देखील अनेकदा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्षरेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारालगत तिकीट विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातूनच प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे येथे एक चौकशी कक्षाची स्थापना करुन कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे आवश्वक आहे. त्यासोबतच विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी विशेष सुविधा तयार करण्याची गरज आहे. त्याबरोबरच येथे मोबाईल चार्जिंगसारख्या प्राथमिक सुविधा रेल्वे प्रशासनाने पुरविणे गरजेची आहे.

टॅग्स :railwayरेल्वे