शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमधून भरकटलेल्या आजारी युवकाला भंडारा पोलिसांनी दिला माणुसकीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 12:21 IST

पुण्यात नोकरीसाठी आलेल्या मात्र नंतर काही कारणास्तव भंडारा जिल्ह्यात भरकटत असलेल्या प. बंगालमधील एका युवकाला त्याचे नातेवाईक येईपर्यंत चार दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून देत भंडारा पोलिसांनी आपल्यातील माणुसकीचा सर्वांना परिचय दिला.

ठळक मुद्देचार दिवस केली सेवा इंदुरखा येथील घटना

सिराज शेख।आॅनलाईन लोकमतभंडारा : पुण्यात नोकरीसाठी आलेल्या मात्र नंतर काही कारणास्तव भंडारा जिल्ह्यात भरकटत असलेल्या प. बंगालमधील एका युवकाला त्याचे नातेवाईक येईपर्यंत चार दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून देत भंडारा पोलिसांनी आपल्यातील माणुसकीचा सर्वांना परिचय दिला.२७ नोव्हेंबरला सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान एक युवक संशयात्मकरित्या इंदुरखा येथे फिरत असल्याचे तेथील पोलीस पाटलांनी मोहाडी पोलिसांना सूचना दिली. अशा प्रकरणात गावकरी चांगलाच चोप देतात हे पोलिसांना चांगले ठाऊक असल्याने एकादी अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस तात्काळ तिथे पोहचले.युवकाला आपल्या ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. त्याची विचारपूस केली असता त्याला हिंदी किंवा मराठी भाषा बोलता येत नव्हती. तसेच त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी अनेक उपाययोजना करून त्याचा पत्ता काढला असता तो पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातील मयूरेश्वर पोलीस ठाण्यात संपर्क करून त्या युवकाबद्दल माहिती दिली असता त्या युवकाचे नाव अयनुल बारी रा.गोचेपाडा, जिल्हा बिरभुम पश्चिम बंगाल असल्याचे समजले. त्यानंतर व्हाट्सअ‍ॅपच्या व्हीडीओकॉलींगद्वारे त्या युवकाची फोटो त्याच्या नातेवाईकांना दाखविली व त्या युवकाचे संभाषणही करून दिले. त्या युवकाला त्याच्या नातेवाईकांशी भेट करून देण्यासाठी पोलीस निरीक्षक एस.के. चव्हाण, ओमप्रकाश गेडाम, सुनिल केवटसह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहयोगाची भूमिका निभावली.चार दिवसाचे आदरातिथ्यच्हा युवक अनेक दिवसापासून उपाशी असल्याने व गावोगाव फिरत असल्याने त्याची मानसिक स्थिती खालावली होती. तो पुणे येथे कामासाठी आला होता. परंतु तेथून पळून जावून इकडे तिकडे फिरत होता. पोलिसांनी त्याला हाकलून न देता त्याच्या परिवाराचा शोध लावण्याचा विचार करून त्याला ठाण्यातच ठेवले. २७ ते ३० नोव्हेंबर पर्यंत त्याच्या राहण्याची व जेवणाची सोय केली. हा पुन्हा येथून पळून न जावो म्हणून त्याची दिवसा, रात्री रखवालीही केली. या चार दिवसात एखादे वेळ जेवणाला उशिर झाला तर तो पोलिसांवरच रागावायचा. त्याचा रागही मोहाडी पोलिसांनी सहन करून पोलिसही शेवटी माणूसच आहेत. त्यांच्यातही संवेदना असतात. परोपकाराची, माणुसकीची भावना असते हे या प्रकरणावरून दाखवून दिले.

टॅग्स :Policeपोलिस