Bhandara | घराच्या पट्ट्यावरुन ग्रामसभा वादळी; समता एकता नगरवासीयांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 05:26 PM2022-08-31T17:26:30+5:302022-08-31T17:28:18+5:30

खुटसावरी येथील प्रकार : विविध मुद्यांवर गाजली सभा

Bhandara | Gram Sabha storms from house belt; The anger of the townspeople of Samata Ekta Nagar | Bhandara | घराच्या पट्ट्यावरुन ग्रामसभा वादळी; समता एकता नगरवासीयांचा संताप

Bhandara | घराच्या पट्ट्यावरुन ग्रामसभा वादळी; समता एकता नगरवासीयांचा संताप

Next

देवानंद नंदेश्वर 

भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथे मंगळवारी आयोजित सर्वसाधारण सभा समता एकता नगर येथे पट्टे देण्याच्या विषयावरून चांगलीच गाजली. यासह घरकुल व इतर योजनांच्या लाभासाठी वादळी ठरली.

सरपंच मनीषा वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी उपसरपंच संदीप खंडाते, सदस्य ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे, संगीता बोरकर, ऋषाली शहारे, राकेश शेंडे यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक प्रदीप चेटुले यांनी ग्रामसभेची सुरुवात शासकीय योजनांचे वाचन करुन केले. यावेळी एमआरपीजीएस वार्षिक, सामाजिक अंकेक्षण २०२०-२१ ते २०२१-२२ चे अहवाल वाचन करण्यात आले. त्यानंतर २०२२-२३ चे पुरक नियोजन, नियोजन तयार करुन करणे व लेबर बजेट सादर करण्यात आले.

शासनाकडून आलेले परिपत्रक, पत्र, आदेश वाचन करुन चर्चा करण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांचे व प्रतिक्षेत असलेल्या लाभार्थ्यांचे नावांची घोषणा यावेळी ग्रामसेवकांनी केली. त्यानंतर ग्रामसेवकांनी समता एकता नगर येथील ६४ नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदनाचे वाचन करण्यात आले. या निवेदनात समता एकता नगरवासियांना घराचे पट्टे देण्यात यावे, आम्ही १९८४ पासुन जवळपास १०० कुटूंब वास्तव्यास आहोत. पट्टे न मिळाल्याने येथील नागरिकांना निवडणूक लढविता येत नाही. जर लढविली तर प्रशासनाकडे तक्रार केली जाते. अशीच एक तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे टोलीवासियांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.

हा अन्याय दूर व्हावा यासाठी जवळपास २ तास चर्चा झाली. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता लाखनी पोलीस सभास्थळी दाखल झाले होते. एकंदरीतच सभा वादळी ठरली. जर ग्रामपंचायतच्या वतीने घरांचे पट्टे देण्याच्या प्रक्रियेत चालढकलपणा केला तर येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समता एकता नगरवासियांनी दिला आहे.

१० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

ग्रामसभेपूर्वी १० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या वतीने करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष सत्यवान पेशने, उपाध्यक्ष श्रावण दिघोरे, अरुण मांढरे, दीपक भुते, सचिव संघदीप भोयर, शेषराव शेंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधेश्याम राऊत, खंडाते यांच्यासह ग्रामपंचायत व इतर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Bhandara | Gram Sabha storms from house belt; The anger of the townspeople of Samata Ekta Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.