शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Bhandara–Gondiya Bypoll 2018 : भंडारा- गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु -  अभिमन्यू काळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 13:33 IST

काही ठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याचे सांगत मतदान प्रक्रिया रद्द केल्याचे वृत्त आले होते. परंतू, निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी या वृत्ताचे खंडन करत भंडारा- गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु असून कुठल्याही ठिकाणचे मतदान रद्द केले नाही असे सांगितले. 

मुंबई : भंडारा-गोंदियातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येत आहे. मात्र, मतदानादरम्यान, काही ठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याचे सांगत मतदान प्रक्रिया रद्द केल्याचे वृत्त आले होते. परंतू, निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी या वृत्ताचे खंडन करत भंडारा- गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु असून कुठल्याही ठिकाणचे मतदान रद्द केले नाही असे सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे म्हणाले की, भंडारा- गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु आहे. या मतदार संघातील कुठल्याही ठिकाणचे मतदान रद्द केले नाही. 35 ठिकाणचे मतदान रद्द झाल्याचे वृत्त खोटे आहे. तसेच, या मतदारसंघातील सर्व ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले हे मैदानात उतरले आहेत.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण