शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 20:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपविरूद्व राज्यभरात मोर्चाच उघडला होेता. जेव्हा केव्हा या पोटनिवडणुकीची घोषणा होईल तेव्हा पटोलेंचा अहंभाव उतरविण्याचा चंग राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपने बांधला होता. परंतु, पायाला भिंगरी बांधल्यागत प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांनी दोन्ही जिल्हे पिंजून काढले. आणि मधुकर कुकडे यांच्या रूपाने काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला विजय मिळवून दिला.

ठळक मुद्देभाजपला अतिआत्मविश्वास नडला

नंदू परसावार / अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपविरूद्व राज्यभरात मोर्चाच उघडला होेता. जेव्हा केव्हा या पोटनिवडणुकीची घोषणा होईल तेव्हा पटोलेंचा अहंभाव उतरविण्याचा चंग राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपने बांधला होता. परंतु, पायाला भिंगरी बांधल्यागत प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांनी दोन्ही जिल्हे पिंजून काढले आणि मधुकर कुकडे यांच्या रूपाने काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला विजय मिळवून दिला.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जागा वाटपाच्या सुत्रानुसार राष्ट्रवादी व काँग्रेसनेही या जागेवर दावा केला होता. मात्र ही जागा कुणाला मिळेल यावर बरीच खलबते झाली. अखेर प्रफुल्लभाईनी ही जागा राष्ट्रवादीकडे खेचून आणली. त्याचवेळी या उमेदवारीवर दावा करणारे नाना पटोले यांनी ही जागा राष्ट्रवादीला मिळाली असली तरी विजयाची जबाबदारी आपल्यावर आहे, असे सांगून पहिल्या दिवसापासून मतदार संघाची बांधणी करण्यासाठी सरसावले होते. अशातच राष्ट्रवादीचा पराभव नव्हे तर पटोलेंना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी भाजपने सहाही विधानसभेत १८० विस्तारक नेमले होते. याशिवाय राज्यातील मंत्र्यांच्या प्रचारसभा घेतल्या. परंतु वाढती महागाई, शेतकºयांचा आक्रोश, मोदींनी दिलेल्या आश्वासनांची खैरात आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि अखेरच्या टप्प्यात ईव्हीएमचा झालेला घोळ याच मुद्यांमुळे मतदारांनी भाजपला सपेशल नाकारले.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे पाच आमदार आहेत. यात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हेही याच मतदार संघातील असून त्यांच्या सोबतीला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे भंडाराचे पालकमंत्री आहेत. असे असतानाही गोंदिया विधानसभा क्षेत्र वगळता तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनीमोरगाव आणि तिरोडा या पाचही विधानसभा क्षेत्रात भाजप मतांच्या आघाडीत माघारला आहे. याशिवाय भंडारा, तुमसर, साकोली, तिरोडा या नगर परिषदमध्येही भाजपची सत्ता आहे. परंतु विकासाचा स्थानिक मुद्दा भाजपकडे नव्हता. याशिवाय मागील निवडणुकीत पटेलांचा पराभव केलेले पटोले हे आता काँग्रेसवासी झाल्याने त्यांच्यात ‘दिलजमाई’ झाली. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक एकदिलाने लढली. आम्ही आता एक झाले आहोत त्यामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्याला विकासापासून कुणीही रोखू शकणार नाही, अशी भावनिक साद पटेल-पटोले या दोन्ही नेत्यांनी मधुकर कुकडे यांच्या उमेदवारीची घोषणा करताना घातली होती. ही भावनिक साद मतदारांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरली. आणि याच विश्वासाचे फलित मधुकर कुकडे यांच्या विजयात झाले. यासोबतच भाजपच्या नेत्यांना अतिआत्मविश्वास नडल्यामुळे हेमंत पटलेंना पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी नाना पटोले यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे छाती ठोकून सांगणाऱ्यांना कोणता संदेश द्यायचा आहे, ते जनतेने मतपेटीतून दाखवून दिले.

टॅग्स :Bhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018NCPराष्ट्रवादी काँग्रेस