शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Bhandara Gondia Lok Sabha Results 2024 : दुसऱ्या फेरीनंतरही सुनील मेंढे यांची आघाडी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: June 4, 2024 12:06 IST

Bhandara Gondia Lok Sabha Results 2024 : भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे 3,096 मतांची आघाडी

लोकमत न्यूज नेटवर्कBhandara Gondia Lok Sabha Results 2024  : मतमोजणीची दुसरी फेरी जाहीर झाली असून या फेरीतही भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे 3,096 मतांची आघाडी घेतली आहे. सुनील मेंढे यांना 48,385 मते मिळाली असून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना 43,289 मते मिळाली आहे.  

रिंगणामध्ये 18 उमेदवार असले तरी भाजपाचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यातच दिसत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दुसरी फेरी जाहीर केली असली तरी प्रोग्रेसिव्ह फेऱ्यांमध्ये देखील  सध्या तरी सुनील मेंढे हेच आघाडीवर दिसत आहेत. पहिल्या फेरीमध्ये सुनील मेंढे 1,090 मतांनी आघाडीवर होते. मेंढे यांना 22,990 तर प्रशांत पडोळे यांना 21,900 मते होती. सध्याची स्थिती पाहता तिसऱ्या स्थानावर संजय कुंभारकर हे आहेत. या फेरी अखेर त्यांना 1,788 मते मिळाली आहेत.

या लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात १८ उमेदवार होते. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत येथे बसपाचे संजय कुंभलकर, वंचित बहुजन आघाडीचे संजय केवट आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार सेवक वाधाये यांची उमेदवारी अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सुनील मेंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्यात लढत झाली होती. यात सुनील मेंढे यांनी ६ लाख ५० हजार २४३ मते, तर नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८५९ मते मिळाली होती. यात भाजपचे सुनील मेंढे हे १ लाख ९७ हजार ३९४ मतांनी विजयी झाले होते. तर बसपाच्या विजया नंदूरकर या ५२ हजार ६५९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होत्या, वंचितचे उमेदवार नान्हे यांना ४५ हजार ८४२ मते मिळाली होती. तर 'नोटा'ला १० हजार ५२४ मते मिळाली होती.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाbhandara-acभंडारा