भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाच्या उच्चस्तरीय चाैकशी समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्याचे पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी शनिवारी भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकांसह सात जणांवर कारवाई झाली आहे. आता पाेलीस महासंचालकांच्या भेटीनंतर या प्रकरणात पाेलीस कारवाई हाेणार काय याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला नऊ जानेवारीच्या पहाटे अग्नितांडवात दहा बालकांचा बळी गेला हाेता. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली.उच्चस्तरीय चाैकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीचा अहवाल गुरुवारी शासनाला सादर करण्यात आला. त्यावरून सात जणांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, शनिवारी दुपारी ४ वाजता राज्याचे पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली.
भंडारा अग्निकांड : पाेलीस महासंचालकांकडून भंडारा जिल्हा रुग्णालयाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 20:21 IST