शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भंडारा जिल्ह्यात काेराेना वर्षात मद्यपींनी रिचविली ८४ लाख लीटर दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 5:00 AM

लाॅकडाऊनच्या काळात मद्यविक्रीत घट आल्याचे दिसून येत असून मार्च महिन्यात दारूची सर्वाधिक विक्री झाल्याचे दिसून येते. भंडारा जिल्ह्यात परवानाधारक देशी-विदेशी दारू विक्री दुकानांसह बिअरबार आणि वाईनबारमध्ये दारू अधिकृतरित्या विकली जाते. गत वर्षी काेराेनाचा संसर्ग असल्याने एप्रिल महिन्यात एक लीटरही दारूची विक्री झाली नाही. अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सर्वप्रथम दारू विक्रीलाच त्यामुळे मे महिन्यापासून सर्वत्र सुरू झाली.

ठळक मुद्देदेशी दारूविक्रीत २३ टक्के वाढ : विदेशी दारू आणि बिअरची घटली मागणी

संताेष जाधवरलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेना संसर्ग वर्षात भंडारा जिल्ह्यात मद्यपींनी तब्बल ८४ लाख ७ हजार ६१६ लीटर दारू रिचविली असून देशी दारूच्या विक्रीत गत वर्षीच्या तुलनेत ८ लाख लीटर म्हणजे २३ टक्केने वाढ नाेंदविण्यात आली. विशेष म्हणजे विदेशी दारू आणि बिअरबारची मागणी घटल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विवरण पथकावरून स्पष्ट हाेेते. लाॅकडाऊनच्या काळात मद्यविक्रीत घट आल्याचे दिसून येत असून मार्च महिन्यात दारूची सर्वाधिक विक्री झाल्याचे दिसून येते. भंडारा जिल्ह्यात परवानाधारक देशी-विदेशी दारू विक्री दुकानांसह बिअरबार आणि वाईनबारमध्ये दारू अधिकृतरित्या विकली जाते. गत वर्षी काेराेनाचा संसर्ग असल्याने एप्रिल महिन्यात एक लीटरही दारूची विक्री झाली नाही. अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सर्वप्रथम दारू विक्रीलाच त्यामुळे मे महिन्यापासून सर्वत्र सुरू झाली. एप्रिल ते मार्च या कालावधीत ६८ लाख ६ हजार ५२५ लीटर देशी दारूची विक्री करण्यात आली. गत वर्षी ५५ लाख ३० हजार ४४२ लीटर दारू विकण्यात आली हाेती. गतवर्षीच्या तुलनेत मद्यपीनीं ७२ लाख ७६ हजार १८४ लीटर मद्य अधिक रिचवल्याचे दिसून येत आहे. एप्रिल ते मार्च महिन्यात विदेशी दारूची विक्री १५ लाख २ हजार ९१२लीटर झाली हाेती. गत वर्षी हीच विक्री १६ लाख २६ हजार ७७८ लीटर हाेती. विदेशी दारूच्या विक्रीत एक लाख ७६ हजार ७६६ लीटरची घट नाेंदविण्यात आली. ८ लाख ३७ हजर ९३०लीटर बिअरची विक्री काेराेना वर्षात झाली हाेती. त्यापूर्वी ही विक्री ९ लाख ७४ हजार ८१६ लीटर हाेती. एक लाख ३६ हजार आठशे ८६ लीटर बिअर कमी विकली गेली.

वाईनची विक्री वाढलीउच्चभ्रू नागरिकांमध्ये वाईन सेवन करण्याचे फॅड भंडारा जिल्ह्यातही वाढत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट हाेते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात वाईन विकण्यात आली हाेती. तर२०१९-२० मध्ये ११ हजार ५६०लीटर वाईन विकली गेली हाेती. दाेन हजार ५८७ वाईनच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लाॅकडाऊनने एप्रिलमध्ये विक्री शून्यगतवर्षी एप्रिल महिन्यात काेराेना संसर्गाने लाॅकडाऊन घाेषित करण्यात आले हाेते. मद्यविक्रीलाही बंदी करण्यात आली हाेती. त्यामुळे मद्यपींची माेठी अडचण झाली हाेती. या कालावधीत जिल्ह्यात कुठेही एक लीटर दारू विकली गेली नाही. मात्र लाॅकडाऊन लागण्यापूर्वी अनेकांनी दारूचा साठा करून ठेवला हाेता. तर काहींनी आपला शाेक हातभट्टीच्या दारूवर भागविला हाेता. 

जिल्ह्यातील परवानाधारक दारुविक्रेते बार, वाईनशाॅप, मालकानी शासनाने वेळाेवेळी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. परवानाधारक बार मालकाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कारवाई करण्यात येईल.- शशिकांत गर्जे, अधीक्षकराज्य उत्पादन शुल्क, भंडारा

 

 

टॅग्स :liquor banदारूबंदी