शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 14:49 IST

प्रेमीयुगुलाने वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा शहरालगतच्या कारधा येथे रविवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली.

भंडारा : प्रेमीयुगुलाने वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरालगतच्या कारधा येथे रविवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. एकमेकांचे हात ओढणीने बांधून त्यांनी नदी पात्रात उडी घेतली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  विशाल गणेश शेंडे (22) आणि दीक्षा मारबते अशी मृतांची नावे आहेत. भंडारा शहरालागत असलेल्या कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात रविवारी सकाळी दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना काही नागरिकांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ कारधा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक मासेमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. मृतदेहाजवळ आढळलेल्या मोबाइलच्या आधारे त्यांची ओळख पटली. विशाल मोलमजुरीचे काम करीत होता. विशालच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तो गुरुवारी सायंकाळी 6 वाजता शंभर रुपये घेऊन घरून निघून गेला. मात्र घरी परत आला नाही. त्याचा शोध घेऊनही पत्ता लागला नाही. त्यामुळे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. दरम्यान रविवारी सकाळी वैनगंगा नदीपात्रात त्याचा अाणि दीक्षाचा मृतदेह आढळून आला. दीक्षा आणि विशाल हे एकमेकांचे नातेवाईक असून आपल्या प्रेमाला विरोध होत असल्याने त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असावी असा कयास आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळल्याची माहिती होतात वैनगंगा नदी तीरावर नागरिकांची एकच गर्दी झाली होती.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी