शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
3
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
4
'अमेरिका स्वतः रशियन तेल खरेदीची परवानगी देते; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
5
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
6
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
7
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
8
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
9
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
10
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
11
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
12
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
13
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
14
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
15
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
16
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
17
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
18
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
19
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
20
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?

३०० दिव्यांगांना मिळणार युनिक कार्डचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:19 IST

दिव्यांग प्रवाशांना रेल्वेने प्रवेश करण्यासाठी सवलत कार्ड देण्यात येतात. हे कार्ड तयार करण्यासाठी दिव्यांगाना अनेक प्रक्रियेतून जावे लागते. दिव्यांग लोकांना या प्रक्रियेपासून त्रास होऊ नये म्हणून भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने युनिक कार्ड बनवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देभंडारा रोड रेल्वे स्थानकावर विशेष शिबीर

आॅनलाईन लोकमतवरठी : दिव्यांग प्रवाशांना रेल्वेने प्रवेश करण्यासाठी सवलत कार्ड देण्यात येतात. हे कार्ड तयार करण्यासाठी दिव्यांगाना अनेक प्रक्रियेतून जावे लागते. दिव्यांग लोकांना या प्रक्रियेपासून त्रास होऊ नये म्हणून भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने युनिक कार्ड बनवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते. यात ४०० दिव्यांग लोकांनी हजेरी लावली त्यापैकी ३०० लोकांना युनिक कार्ड योजनेत सहभागी करण्यात आले. दिव्यांगांचा प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने सोमवारला पुन: शिबीर आयोजन करण्याची घोषणा केली.दिव्यांग प्रवाशांना रेल्वेने प्रवेश करण्यासाठी विशेष सवलत देण्यात येते. यासाठी रेल्वे विभाग विशिष्ठ कार्ड धारकांना सवलत देते. यासाठी अनेक प्रक्रिया असून दिव्यांगांना शासनस्तरावर देण्यात येणारे प्रमाणपत्र व रेल्वे विभागाचे फॉर्म भरून पुन: जिल्हा स्तरावरून पडताळणी करून पुन: रेल्वे विभाग नागपूर यांचेकडे कागदपत्र सादर करावी लागत होते. एकंदरीत सर्व प्रक्रिया त्रासदायक होती. यामुळे लाभार्थ्यांना शारीरिक व आर्थिक त्रास होत होता. दिव्यांगांना होणार त्रास लक्षात घेऊन रेल्वे विभागाने सादर प्रकारचे युनिक कार्ड वाटप व योग्य ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा स्तरावर भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर शिबीर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून रेल्वे स्टेशनवर लोकांची गर्दी होती. शिबिराला उपस्थित लोकांकडून मूळ कागदपत्र तपासल्या नंतर ३०० दिव्यांगांना लाभार्थी म्हणून कार्ड वाटप होणार आहेत.कार्यक्रमास आमदार चरण वाघमारे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे, भाजप च्या दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोकाला चौधरी, वरिष्ठ मंडळ अधिकारी अर्जुन सिब्बल, मंडळ वाणिज्य अधिकारी डी एस. तोमर, माजी सरपंच निरंजना साठवणे, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, माजी सभापती हरिश्चंद्र बधाटे, स्टेशन मास्टर कल्याण रामटेके पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक सी के टेम्भूर्णीकर उपस्थित होते.यावेळी भंडारा सामान्य रुग्णालयाचे मनोरुग्ण तज्ज्ञ डॉ रत्नाकर बांडेबुचे, डॉ प्रदीप आनंद, डॉ विनोद गडसिंघ, डॉ प्रदीप आकरे, विकास गभणे, स्नेहा मेश्राम व माधुरी साखरवाडे यांनी दिव्यांगांना पडताळणी केली.रेल्वे विभागाव्दारे वाटप होणा?्या युनिक कार्डचा वापर प्रवाशांना आनलाईन तिकीट काढण्यासाठी सुद्धा करण्यात येणार आहे. यापूर्वी घेण्यात आलेल्या शिबिरात सहभाग घेतलेल्या दिव्यांगांना आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते युनिक कार्ड वाटप करण्यात आले.आज पुन्हा शिबीरभंडारा रोड रेल्वे स्टेशन येथे आयोजित शिबिरात जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांनी सहभाग नोंदवला. अनपेक्षित गर्दी झाल्यामुळे पाहिजे त्या कालावधीत शिबिरात सहभागी लोकांना लाभ देता आले नाही. त्यामुळे सादर शिबिर सोमवारला आयोजित केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.