शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:08 IST

करडी येथील नागरिक कित्येक दिवसांपासून इंदिरा आवास योजना (प्रधानमंत्री आवास योजने) अंतर्गत मिळणाऱ्यां घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत.

ठळक मुद्देकरडी येथील प्रकार : श्रीमंतांना मिळतोय योजनेचा लाभ

युवराज गोमासे ।आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : करडी येथील नागरिक कित्येक दिवसांपासून इंदिरा आवास योजना (प्रधानमंत्री आवास योजने)े अंतर्गत मिळणाऱ्या घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत. त्या सर्वांची घरे कोसळली आहेत. ताडपत्रीच्या खाली परिवाराचा प्रपंच चालवत आहेत. स्वत:चा घरही बांधू शकत नाही. ही वास्तवस्थिती आहे. दारिद्रयात जगणाºया कचरा गाढवे, सुमन डोहळे, तुकाराम ठाकरे, सोनू ठाकरे व पंढरी सोनवाने यांची परंतू ना लोकप्रतिनिधींना ना शासन प्रशासनाला यांच्याकडे लक्ष पुरवायला वेळ आहे. ग्रामपचांयतसह उपरोक्त सर्वांच्या निष्क्रीय व उदासिन धोरणाचे बळी करडी येथील सदर नागरिक ठरले आहेत.कित्येक वर्षांपासून ते घरकुलाची मागणी करीत आहेत. तरीही घरकुलाचा लाभ त्यांना मिळालेला नाही. ग्राम पंचायत पदाधिकारी व वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचे बळी ठरले आहेत. कचरा हरीराम गाढवे हिने कित्येक वेळा ग्रामसभेत घरकुलासंबंधी विषय मांडला. पंरतू तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. श्रीमंताना व गरज नसलेल्यांना घरकुलाचा लाभ मिळत असताना यांच्या गरीबीकडे डोळेझाक केली जात आहे. ह्या महिलेचा घर पाडला असून छताच्या खाली जीवन जगत आहे. अश्या परिस्थितीही तीन मुलींचा लग्न केलेला आहे. एका मुलीचे लग्न शिल्लक आहे. घरची परिस्थितीची मात्र नाजूक आहे. सोनु मंगरु ठाकरे या महिलेचा संपुर्ण घर पडला असून ती घर बांधू शकत नाही. तिची परिस्थिती बिकट आहे. पंढरी साठवणे याच्याही दारिद्रयाला पारावार नाही. अत्यंत दयनिय जीवन जगत आहे. ते सुध्दा बेघर असून घर बांधू शकत नाही. कुटुंबात कमावती व्यक्ती एकटीच आहे.या सर्व गरजवंतानी कित्येक वेळा घरकुल संबंधी ग्राम पंचायतच्या ग्रामसभेत विषय मांडला, घरकुलाची मागणी केली. पंरतू त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यांचे घरकुलाच्या/ प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतिक्षे यादीत नाव सुध्दा आलेला नाही. उलट श्रीमंत लोकाचे नाव सन्मानचिन्ह करण्यात आले पण गरीबांना ढवलण्यात आले आहे. ह्यामुळे या सर्व गरीब गरजवंतानी आमरण उपोषणावर बसण्याची तयारी केली आहे. आता उपोषण करुन शासन प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधीच्या धुळफेक करणाºया जाहिरातबाज धोरणाचा निषेध करीत मेलेले बरे, असा निर्धार घरकुल लाभार्थी कचरा गाढवे, सुमन ढोहळे, प्रकाश हलमारे, तुकाराम ठाकरे, सोनू ठाकरे, पंढरी साठवणे यांनी व्यक्त केलेला आहे.‘मी लाभार्थ्या’मध्ये जीवन-मरणाचा संघर्षमी लाभार्थी आहे, शासनाच्या पोकळ आश्वासनाचा. श्रीमंताना घरकुलाचा लाभ मिळतांना पाहून त्यांच्या टोलेगंज इमारतीसमोर उभा राहून स्वत:ला दोष देण्याचा. स्वत:च्या पोरांना मृत्यूनंतरही थंडीत व बेघर ठेवण्याचा. स्वप्नातील घरता राहून पोराना शासन प्रशासनाच्या दातृत्वाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगण्याचा. आभाळभर दारिद्रय घेवून जगण्याचा व मरण्याचा संघर्ष येथे पाहायला मिळत आहे.