शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांना ३ महिन्यांचे रेशन मिळणार एकाच वेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:35 IST

पूरबाधित गावांना प्राधान्य : जूनमध्येच वितरित होणार रेशन धान्य

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. अतिवृष्टी, महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत रेशन पुरवठ्यात अडथळा येऊ नये म्हणून शासनाने तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांना पुरवठासुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. पूरबाधित गावांना धान्य पुरवठा करण्यात प्राधान्य दिले जात आहे.

जिल्ह्यात १५४ गावे नदीकाठावर असून १३० गावे दरवर्षी नदी व नाल्यांमुळे बाधित होतात. तालुका, जिल्हा मुख्यालयाशी नागरिकांचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना कधी कधी आठवडाभर गावातच राहावे लागते. काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविले जाते. हा धोका ओळखून ग्रामीण भागात पावसाळ्यातील तीन महिन्यांचे रेशन जून महिन्यातच पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात धान्य पोहोचविण्याचे काम सुरू झालेले आहे. काही तालुक्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान पोहोचवून वाटपही सुरू केलेले आहे. यामुळे आपदेवेळी उडणारी तारांबळ थांबणार आहे. 

दुकानदार तीन महिन्यांचे धान्य कुठे ठेवणार?जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे जवळपास दोन महिन्यांचा धान्यसाठा करण्याची व्यवस्था आहे. बहुतांश दुकानदारांकडे हीसुद्धा व्यवस्था नाही. केवळ एका महिन्याचे ते धान्य साठवून ठेवू शकतात. मात्र, आता तीन महिन्यांचे धान्य प्राप्त होत असल्याने ते धान्य कोठे ठेवावे, असा प्रश्न आहे.

३० तारखेच्या आत धान्याची उचल करातीन महिन्यांच्या स्वस्त धान्याची उचल करण्यासाठी जिल्ह्यातील रेशन ग्राहकांना ३० जूनच्या आत स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्याची उचल करावी लागणार आहे. 

अतिवृष्टी, पूर परिस्थितीत त्रास होऊ नये म्हणून...लाभार्थ्यांना अतिवृष्टी, पूरस्थितीत धान्याची उचल करताना त्रास होऊ नये, यासाठी शासनाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे.

"पावसाळ्यात रेशन लाभार्थ्यांची पूरपरिस्थितीमुळे अडचण होऊ नये, यादृष्टीने शासनाने जून महिन्यातच तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दुकानदाराकडे धान्य पुरविण्यात आले आहे."- नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा

टॅग्स :bhandara-acभंडारा