शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शूरवीरांमुळेच भारत देश अखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 22:05 IST

भारत देश शूरवीरांच्या बलिदानाने आज अखंड आहे. शूरवीरांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन आपण काम करायला पाहिजे. समाजाची प्रगती मार्गदर्शनामुळे होते. क्षत्रीय राजपूत समाजात सगळ्यांचा योगदान असणे आवश्यक आहे. महाराणा प्रताप यांचे वंशज समोर समोर चालत राहावे. समाजाची उन्नती व्हावी, असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : लाखनीत महाराणा प्रताप यांचा ४७८ वा जन्मोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भारत देश शूरवीरांच्या बलिदानाने आज अखंड आहे. शूरवीरांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन आपण काम करायला पाहिजे. समाजाची प्रगती मार्गदर्शनामुळे होते. क्षत्रीय राजपूत समाजात सगळ्यांचा योगदान असणे आवश्यक आहे. महाराणा प्रताप यांचे वंशज समोर समोर चालत राहावे. समाजाची उन्नती व्हावी, असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.महाराणा प्रताप क्षत्रीय युवा मंच तर्फे वीर शिरोमणी क्षत्रीय कुलभूषण महाराणा प्रताप यांची ४७८ वा जन्मोत्सव लाखनी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार पटेल बोलत होते. १८ जून ला सकाळी बाईक रॅली सोबत महाराणा प्रताप यांची शोभायात्रा काढण्यात आली.‘जय महाराणा जय राजपुताना’ च्या घोषणेने संपूर्ण लाखनी नगरी दुमदुमली होती. या मोटार साईकील रॅलीचे नेतृत्व जिल्हा कार्याध्यक्ष धनू व्यास, माजी तहसीलदार राजीवसिंह शक्करवार यांनी केले. रॅली मुरमाडी सावरी लाखनीच्या मुख्य मार्गाने डी.जे. तालावर फटाक्यांच्या आतषबाजीने काढण्यात आली. ठिकठिकाणी या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रा पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी उसळली होती.दुपारी १२ वाजता सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता संगीत आर्केस्ट्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अरण्ययात्री फाउंडेशन तर्फे पक्षी फोटो प्रदर्शनी, राजे गार्डन आर्ट प्रदर्शनी लावण्यात आली होती.सायंकाळी ६ वाजता महाराणा प्रताप जन्मोत्सव समारोहाच्या उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते तथा माजी खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.नाना पटोले म्हणाले, शूरविरांनी अन्यायाच्या विरुद्ध लढाई केली. राजाची गोष्ट येते तेव्हा महाराणा प्रताप यांची आठवण होते. महाराष्ट्रात ४५ लाखांच्या वर क्षत्रीय राजपूत समाजातील लोक राहतात. महाराणा प्रतापांच्या वंशजांना समोर जाण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही. अतिथी म्हणून खासदार मधुकर कुकडे, पंकज सिंह, कविता परिहार, राजीव शक्करवार, माजी आमदार सेवक वाघाये, ओमप्रकाशसिंह पवार, जि.प. सभापती, सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी महाराणा प्रताप क्षत्रीय युवा मंच समिती लाखनी कडून मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व महाराणा प्रताप सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.खुशी कलचुरी ने महाराणा प्रताप यांच्या जीवन चारित्र्यावर सुंदर कवितेचे सादरीकरण केले. यावेळी सत्कार मूर्ती खासदार मधुकर कुकडे, अखिल भारतीय क्षत्रीय महासभेचे प्रदेश अध्यक्ष ठाकुर पंकज सिंग, प्रदेश सचिव कविता परिहार, माजी तहसीलदार राजीव शक्करवार, अविनाश ब्राम्हणकर, सेवक वाघाये यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन समोर कार्य करावे असे सांगितले.जन्मोत्सव समारोहासाठी महाराणा प्रताप क्षत्रीय युवा मंच चे अध्यक्ष घनश्यामसिंह परिहार, धनू व्यास, कुलदीपसिंह बाच्छील, लक्ष्मीकांत बघेल, रमेशसिंह बैस, पवनसिंह कच्छवाह, आकाश सिंह गहरवार, करणसिंह व्यास, शैलेशसिंह कोहरे, लिखीरामसिंह सूर्यवंशी, हेमराजसिंह भारद्वाज, सुरेशसिंह बघेल, रंजनसिंह चौहाण, रवीसिंह व्यास, महेंद्रसिंह कच्छवाह, विरेंद्रसिंह कलचुरी, नितीन कच्छवाह, शुभम बघेल, विक्की बैस, राजेंद्रसिंह कच्छवाह आदींनी सहकार्य सकेले.