शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

भंडारा जिल्ह्यात वाघाच्या तीन बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू, वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 4:54 PM

Bhandara : भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळील टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुधवारी सकाळी ७ वाजता वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले.

ठळक मुद्देभंडारा वनविभागासाठी बुधवार हा काळा दिवस ठरला.सोमवारी रात्री टाक्यात बुडून मृत्यू झाला असावा असा कयास आहे.

भंडारा : वाघाच्या तीन बछड्यासह अस्वलाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. भंडारा तालुक्यातील गराडा जवळ दोन बछडे तर रावणवाडी जंगलात एक अस्वल मृतावस्थेत आढळले. या घटनेची हळहळ सुरु असतानाच पवनी तालुक्यातील धानोरी बीटमध्ये एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त धडकले. भंडारा वनविभागासाठी बुधवार हा काळा दिवस ठरला.

भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळील टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुधवारी सकाळी ७ वाजता वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती होताच उपवनसंरक्षक शिवराम भलावी आणि वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक राजूरकर घटनास्थळी दाखल झाले. दोन महिन्याचे असलेले हे दोन्ही बछडे मादी जातीचे होते. सोमवारी रात्री टाक्यात बुडून मृत्यू झाला असावा असा कयास आहे. वनविभागाने दोन्ही बछड्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन गडेगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात शवविच्छेदनासाठी आणले. ही कारवाई सुरु असतानाच भंडारा तालुक्यातील रावणवाडी जंगलात अस्वल मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली. रावणवाडी ते धारगाव रस्त्यावर एक मोठे अस्वल मृतावस्थेत आढळून आले. नेमका तिचा कसा मृत्यू झाला हे अद्याप कळले नाही. वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक राजूरकर घटनास्थळी दाखल झाले.

या दोन घटनांची वनविभाग चौकशी करीत असतानाच पवनी तालुक्यातील धानोरी बिटमध्ये एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या परिसरात असलेल्या वाघीणीला दोन बछडे होते. एका बछड्याला वाघीण सोबत घेऊन गेली. दुसरा बछडा मात्र धानोरी बीटमध्येच राहुन गेला. वनविभागाला या घटनेची माहिती होताच छोट्या बछड्याला रेस्क्यू करीत दूध देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच जागी वाघीण परत येईल व सुटलेल्या बछड्याला घेऊन जाईल म्हणून वनविभागाने बछड्याला तेथेच ठेवले. परंतु बुधवारी सकाळी त्या बछड्याचाही मृत्यू झाल्याचे लक्षात आले. हा बछडा एक महिन्यापेक्षाही लहान असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाचे अधिकारी तिन्ही प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

भंडारा जिल्ह्यासाठी काळा दिवसएकाच दिवशी वाघाचे तीन बछडे आणि एका अस्वलाचा मृत्यू झाला. वनविभागाचा पर्यायाने पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान झाले. या घटनेने जिल्ह्यातील वन्यप्रेमी व सामान्य नागरिक देखील हळहळ करीत होते. भंडारा जिल्ह्यासाठी बुधवार काळा दिवस ठरला.

जिल्ह्यासाठी आजची घटना अत्यंत दुर्देवी आहे. चार वन्यजीवांचा बळी गेला. भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. बुधवार आम्हा वन्यप्रेमींसाठी काळा दिवस ठरला आहे. वनविभागाने अशा घटना कशा टाळता येतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.-नदीम खान, मानद वन्यजीव संरक्षक, भंडारा.

टॅग्स :Tigerवाघ