शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

शिक्षण सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्याचे माध्यम व्हावे

By admin | Updated: November 27, 2014 23:28 IST

कला ही पुढे उड्डाण उद्योजकता रुपात असायला हवी. आपली स्पर्धा ही आपल्याशीच असते. वैचारिक क्रांती घडविण्यासाठी युवकांमध्ये शिस्त व वेळेचा सदुपयोग करण्याची चिकाटी असावी.

जवाहरनगर : कला ही पुढे उड्डाण उद्योजकता रुपात असायला हवी. आपली स्पर्धा ही आपल्याशीच असते. वैचारिक क्रांती घडविण्यासाठी युवकांमध्ये शिस्त व वेळेचा सदुपयोग करण्याची चिकाटी असावी. त्यासाठी शिक्षण हे परिक्षार्थी ऐवजी सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्याचे माध्यम असायला हवे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले.परसोडी येथे युवा बिरादरी परसोडीला १० वर्षे पूर्ण करीत असलेल्या दशक सोहळ्यात त्या बोलत होत्या. उद्घाटन उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, तहसीलदार तेलंग, जिल्हा परिषदेचे माजी राजकपूर राऊत, सरपंच मंजुळा वंजारी, भोजराम वैरागडे, रघुपती फंदे, तलाठी क्षीरसागर, नरेंद्र लेंडे, मोतीलाल येळणे आदी उपस्थित होते. डॉ.खोडे म्हणाले, आपलं देवावर विश्वास श्रद्धा असावं. मात्र श्रद्धा ही अंधश्रद्धा होऊ नये. दैनंदिन जीवनात विज्ञाननिष्ठ विचारांची देवाणघेवाण करावी. यातच आधुनिक नव समाज निर्मितीला बळ मिळतो. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी घोडेस्वार म्हणाले अज्ञानी लोकांना ज्ञानी बनवावे. गावाचं पालकत्व घ्यावे आणि शासनाचे योजना कलेच्या माध्यमातून तळागाळातील घटकापर्यंत पोहचवावे. तेव्हाच पालकत्व घेतल्याचे फलीत होईल.तत्पूर्वी सकाळी संत गाडगेबाबा यांच्या विचाराची वृक्ष व स्वच्छता दिंडी गावात काढण्यात आली. युवा बिरादरीचे कलावंत यांनी दिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपण, स्वच्छता, पाणी वाचवा याविषयावर संगीतमय पथनाट्य ठिकठिकाणी सादर केले. दिंडीमध्ये जि.प. प्राथमिक शाळा, पराग प्राथमिक शाळा, साईराम शाळा, ओम सत्य साई महाविद्यालय परसोडीचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व गावकरी उपस्थित होते. युवाबिरादरीद्वारे गाव स्वच्छ करण्यात आले. यात सर्वांनी हिरहिरीने सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दिंडीचा समारोप करण्यात आला. दुपारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले. समाजप्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रसंगी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आले. (वार्ताहर)