शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

बावनथडी व गोसेखुर्द प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होणार

By admin | Published: July 13, 2017 12:26 AM

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत देशातील ९९ प्रकल्पांचा समावेश असून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द व बावनथडी प्रकल्प या योजनेत समाविष्ट आहेत.

केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री बलियान यांची माहिती : बावनथडी ९७ टक्के पूर्ण : प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्यलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत देशातील ९९ प्रकल्पांचा समावेश असून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द व बावनथडी प्रकल्प या योजनेत समाविष्ट आहेत. बावनथडी प्रकल्पाचे काम ९७ टक्के पूर्ण झाले असून नोव्हेंबर २०१७ अखेर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. गोसेखुर्द प्रकल्प २०१९-२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती केंद्रीय जलसंसाधन व नदी विकास राज्यमंत्री संजीवकुमार बलियान यांनी दिली. यावेळी ना.बलियान यांनी बावनथडी व गोसेखुर्द प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. बावनथडी प्रकल्पाचे काम ९७ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित तीन टक्के काम नोव्हेंबर २०१७ अखेर पूर्ण करणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. केंद्र सरकारने देशातील ९९ प्रकल्पांचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत केला आहे. यात महाराष्ट्र राज्यातील २६ प्रकल्पांचा समावेश आहे. यातील सात प्रकल्पांना प्राधान्यक्रम देण्यात आला असून त्यामध्ये बावनथडी, गोसेखुर्द प्रकल्पाचा समावेश आहे.बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय प्रकल्प असून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांना लाभ होणार आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता महाराष्ट्रात १७ हजार ५३७ हेक्टर तर मध्यप्रदेशात १८ हजार ६१५ हेक्टर एवढी आहे. या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करण्यात आल्यामुळे प्रकल्पाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही ना.बलियान यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेची प्रशंसा करून उत्तरप्रदेशमध्ये याच धर्तीवर ‘तलाव विकास योजना’ सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मालगुजारी तलाव व इतर मोठे तलाव याबाबत केंद्र सरकार गणना करून धोरण ठरविण्याच्या दिशेने पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, गोसेखुर्दचे मुख्य अभियंता कांबळे, अधीक्षक अभियंता गवळी, सोनटक्के, चोपडे, कार्यकारी अभियंता ए.एस. गेडाम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.मंत्र्यांकडून नाना पटोलेंची प्रशंसा केंद्रीय राज्यमंत्री संजीवकुमार बलियान यांनी खासदार नाना पटोले यांची मुक्तकंठाने प्रशंसा करीत म्हणाले, नाना पटोले हे केवळ खासदारच नाही तर ते शेतकरी नेतेसुद्धा आहेत. उत्तरप्रदेशात त्यांना शेतकरी नेते म्हणूनच ओळखले जाते. आपल्या क्षेत्रातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी त्यांचा आवर्जून प्रयत्न असतो. बावनथडी व गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. नागपूरच्या नाग नदीच्या पाण्यामुळे वैनगंगा व गोसेखुर्द प्रदूषणाची त्यांनी सांगितलेली समस्या नोट केली असून त्यावर कार्यवाही सुनिश्चित करण्याचे काम राज्य सरकारचे असल्याचे सांगितले. दरम्यान, मंत्र्यांनी बावनथडी प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना दौरा संपला असे वाटले परंतु जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण व्हावे, अशी तळमळ असल्यामुळे नाना पटोले यांनी मंत्र्यांना गोसेखुर्द प्रकल्पस्थळी घेऊन गेले. गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर मंत्रीमहोदय नागपूरकडे रवाना झाले.