तुमसर : सोन्याच्या दरातील सततच्या घसरणीने सर्वत्र सराफा बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामूळे सोने तारणावर कर्ज देणाऱ्या बँकानाही ऐन पावसाळ्यात घाम फुटला आहे. सोन्याच्या दराने निचांक नोंदविल्याने बँकाची सोने तारण प्रकरण अडचणीत आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ही कर्ज अनूत्पादीत (एन.पी.ए.) होण्याचा धोका असल्याने कर्ज वसूली करिता नोटीस व थेट संपर्क साधून ग्राहकाला गराडा घालत असल्याचे चित्र आहे.सन २०१३ मध्ये सोन्याच्या दराने उचांक गाढला असून तो प्रति तोळा ३५,०७४ रुपयापर्यंत गेला असल्याने सोने तारण ठेवून नागरिकांना कर्ज देण्याकरिता अनेक राष्ट्रीयकृत बँक तसेच सहकारी बँकानी पुढाकार घेतला होता. अन्य तारण कर्जाच्या तुलनेमध्ये सोने तारण हा सुरक्षित प्रकार म्हणून ओळखला जात असल्याने मोठ-मोठ्या राष्ट्रीयकृत बँकासह, सहकारी बँकानाही आजपर्यंत या बँकामध्ये मोठी मुसडी मारली होती. दरम्यान गत काही महिन्यात सराफा बाजार अस्थित होवून सोन्याचे दर वेगाने कोसळतच जात असल्याने सोन्याचा दर २०,५०० रुपये पर्यंतचा निचाांक टप्पा गाढणार की काय अशी भिती व्यक्त होत आहे. यामुळे बऱ्याच बँकेच्या सोने तारण व्याजासह ग्राहकांकडे असलेली थकीत रक्कम तारण ठेवलेल्या सोन्याच्या दरापेक्षाही अधिक होवून बसल्याने राष्ट्रीयकृत बँका तसेच सहकारी बँकाचे धाबे दणाणले आहे. (शहर प्रतिनिधी)
सोने तारणवर प्रकरणी बँकांना घाम
By admin | Updated: July 25, 2015 01:19 IST