शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर बंदी घाला

By admin | Updated: February 20, 2015 00:34 IST

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्य शासन तंबाखूबंदीच्या मोहीमेवर गांभीर्याने विचार करीत आहे.

भंडारा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्य शासन तंबाखूबंदीच्या मोहीमेवर गांभीर्याने विचार करीत आहे. उशिरा का असेना शासनाला जाग आली. आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी तंबाखूमुक्तीसंदर्भात मोहीम राबविण्याची तयारी सुरु केली आहे. तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहचत असतानाही, कित्येक जीव यमलोकी गेल्यावरही तंबाखूचे सेवन आजही मोठ्या प्रमाणात केले जाते. तंबाखू, गुटखा, पानमसाला, नस या सर्वांचा वापरामुळे मानवी शरीराला धोका असताना व ती बाब माहित असतानाही ते कृत्य वारंवार केले जात असल्यामुळे तंबाखू सेवन ही एक मनोविकृती आहे. त्यामुळे तंबाखू बंदी झालीच पाहिजे, या राज्य शासनाच्या भूमिकेला शहरातील नामवंत डॉक्टरांनी लोकमतच्या चर्चासत्रातून शंभर टक्के पाठींबा दिला. तंबाखू हे हृदयासाठी विषतंबाखूचा सर्वात पहिला परिणाम हा मानवी हृदयाला होत असतो. तंबाखू हे मानवी हृदयासाठी विष आहे. दारू व तंबाखू सेवन करणाऱ्या इसमांना हे तर अत्यंत घातक आहे. तोंडाचा, पोटाचा व अन्ननलिकेचा कर्करोग तंबाखूमुळे होत असतो. तसेच अन्य आजारही या एकट्या तंबाखुच्या सेवनामुळे होत असते. तंबाखू मुक्ती झाली तर आपोआप हृदयाचे आजार कमी होतील.-डॉ. नितीन तुरस्करजनरल फिजीशियनतंबाखूचे सेवन म्हणजे शरीरासाठी धोक्याची सूचनातंबाखुच्या सेवनामुळे मुख रोगाचा कर्करोग होतो. हळूहळू तो पसरून फुफफुस व पोटाच्या कॅन्सरलाही कारणीभूत ठरतो. दुसरीकडे सिगारेट, विडी यापासून निघणाऱ्या धुरामुळे 'एलर्जीक प्राब्लेम' निर्माण होतात. त्यामुळे तंबाखुचे सेवन हे शरीरासाठी धोक्याची सूचना आहे. तंबाखू बंदी झालीच पाहिजे. तंबाखूमुळे मृत्यू होत असताना नागरिकही जागरुक का होत नाही यावरही विचारमंथन होणे गरजेचे आहे.-डॉ. मनोज चव्हाणहृदयरोग तज्ज्ञदर दिवसाला आढळतो एक कर्करूग्णमाझ्याकडे येणाऱ्या रुग्णांपैकी तपासाअंती एकाला तरी कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न होते. एकट्या तंबाखू सेवनाचा हा दुष्परिणाम आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले आहे. गुटखा खाणे हे ‘कॉमन’ झाल्याने कर्करोगाचे रुग्ण दिवसेंगणिक वाढत आहे. तंबाखू बंदीची घोषणा फार पुर्वीच व्हायला हवी होती. उशिरा का असेना शासनाने आगामी दिवसात तंबाखू मुक्तीची आखलेली मोहिम शंभर टक्के यशस्वी झालीच पाहिजे. -डॉ. प्रमोद धुर्वेकान, नाक, घसा तज्ज्ञतंबाखू बंदी झालीच पाहिजेराज्य शासनाने तंबाखू बंदीसंदर्भात भविष्यकालीन कायदा अंमलात आणण्यासंदर्भात जो निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे. तंबाखूवर बंदी आणलीच पाहिजे, तंबाखू, सिगारेट, नस व आदी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे व समाजात जनजागृती करणे यासाठी २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत मोहिम राबविण्यात येणार आहे. इंडियन डेंटल असोसिएशनच्या जवळपास आठ हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही या मोहिमेला आपला पाठिंबा दिला आहे. ज्या तंबाखुच्या सेवनाने शरीराला इजा होते त्यावर बंदी आणलीच पाहिजे.-डॉ. मनिष बत्रादंत रोग तज्ज्ञतंबाखुमुळे हाडे होतात ठिसूळतंबाखुमध्ये निकोटीन हा पदार्थ असल्यामुळे शरीराला त्याची गरज भासत जाते. परिणामी मानसीक दृष्ट्या संबंधित इसम दिवसेंगणिक तंबाखुचे सेवन करतच जातो. कर्करोग तर होतोच मात्र शरीरातील हाडेही ठिसूळ होत जातात. ही बाब फार उशिरा लक्षात येते. तोपर्यंत तंबाखू सेवन करणारा मृत्युच्या उंबरठ्यावर असतो. त्यामुळे तंबाखू आणि दारूच्या सेवनावर बंदी झाली पाहिजे.-डॉ. गोपाल व्यासअस्थिरोग तज्ज्ञसवय बदलने गरजेचे तंबाखूचे सेवन ही एक सवय आहे. तंबाखुमध्ये असणाऱ्या निकोटीनमुळे तंबाखुचे सेवन नियमित करावे, अशी सवय त्या इसमाला लागलेली असते. यासाठी स्वत:हून बदल घडविणे गरजेचे आहे. जनजागृती आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर तंबाखू सेवनाची सवय बंद होवू शकते. या मोहिमेला घरापासूनच सुरूवात करावी लागेल.-डॉ. मिलिंद देशकरअस्थिरोग तज्ज्ञआई-वडिलांची जबाबदारी अत्यंत महत्वाचीलहान मुलेही जेव्हा गुटख्यामधील सुपारी मागतात, तेव्हा तंबाखुचे सेवन या स्तरापर्यंत येवून पोहचले आहे, याचे गांभीर्य कळते. लहान मुलेही गुटखा खात असल्याने त्यांना एॅसिडीटी, अल्सर व आतड्यांवर दुष्परिणाम होण्याचे प्रमाण जाणवते. दिवसेंगणिक या प्रकाराचे रुग्णही एकट्या तंबाखुच्या सेवनामुळे आढळून येत आहेत. यासाठी आई-वडिलांचीही जबाबदारी तितकीच महत्वाची आहे. तंबाखू मुक्तीच झालीच पाहिजे याचा मनापासून निर्धार करणे महत्वाचे असून याची सुरूवात स्वत:पासून झाली पाहिजे.-डॉ. पराग डहाके.बालरोग तज्ज्ञशरीराच्या सर्वांगीण विकासावर विपरित परिणामतंबाखूच्या सेवनामुळे शरीरातील अवयव निकामी होत जातात. प्राथमिक अवस्थेत कर्करोग आहे किंवा नाही याचे निदानच होत नाही. निदान झाल्यावर खूप उशिर झालेला असतो. ज्या तंबाखूच्या सेवनामुळे माणसाला जीवन गमवावे लागते, तरीही त्याचे सेवन करणे बंद होत नाही. ही खरच लाजीरवाणी गोष्ट आहे. दुसरीकडे तंबाखूच्या सेवनामुळे शरीराचा सर्वांगीण विकास खोळंबत असतो. यावर जनजागृती झालीच पाहिजे.- डॉ.यशवंत लांजेवारबालरोग तज्ज्ञ