शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

आम आदमीने केला निषेध

By admin | Updated: March 6, 2017 00:18 IST

केंद्र सरकारच्या विना अनुदानीत सिलिंडरच्या किमतीमध्ये नुकतीच ८६ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ही वाढ लक्षात घेता,

निवेदन : सिलिंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणीभंडारा : केंद्र सरकारच्या विना अनुदानीत सिलिंडरच्या किमतीमध्ये नुकतीच ८६ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ही वाढ लक्षात घेता, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या या जनविरोधी धोरणाचा निषेध करीत, सदर दरवाढ कमी करण्यात यावी, दरवाढ कमी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भंडारा जिल्हा आम आदमी पार्टीकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.निवेदनात, केंद्र सरकारच्या विना अनुदानित सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला आम आमदी पक्ष तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे. केंद्र सरकारने १४.२ किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात तब्बल ८६ रुपयाने वाढ केली आहे. त्यामुळे विना अनुदानित सिलेंडरचे मुल्या एकूण ७३७.५० इतके महाग झाले आहे. एकाच दिवसात अशा प्रकार इतकी मोठी दरवाढ ही इतिहासात प्रथमच होत आहे. मागील महिन्यात १ फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारे प्रती सिलेंडर ६६.६ रुपये इतकी करण्यात आली होती. एकाच महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दरात १५० रुपये वाढ झाली आहे. तसेच आॅक्टोबर महिन्यापासून तब्बल ५८ टक्के म्हणजे जवळपास २७१ रुपये इतकी दरवाढ मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या जनविरोधी धोरणामुळे सामान्य जनतेचे कंबरडे आधीच मोडले आहे. त्यात ही दरवाढ म्हणजे सामान्य माणसाच्या खिशाला अजून एक झटका आहे. सबसिडी सोडा या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. एलपीजी गॅसच्या किमती या कच्च्या तेलाच्या किमतीसोबत निगडीत असतात. ही लूट थांबायलाच हवी आहे असे नमूद आहे. शिष्टमंडळात जिल्हा आम आदमी पक्षाचे पदाधिकारी चंचल साळवे, केशव बांते, स्वप्नील भोंगाडे, संघमित्रा गजभिये यांचेसह कार्यकर्त्यांचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)