बेघरांसाठी बालाघाटवरून मिळाली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:44+5:30

येथे दररोज जिल्हा बाहेरून येणाऱ्या बेघर, निराधार, परराज्यातील मजूर कामगारांची निवासासह भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र शासनाची व्यवस्थादेखील अपुरी पडत असल्याने वसतीगृह अधीक्षक रजनी वैद्य यांनी आपल्या संपर्कातील उच्च पदावर असणाºया परिचित अधिकाऱ्यांना बेघरांच्या मदतीसाठी आवाहन केले.

Balaghat received help for the homeless | बेघरांसाठी बालाघाटवरून मिळाली मदत

बेघरांसाठी बालाघाटवरून मिळाली मदत

Next
ठळक मुद्देव्यक्त केले समाधान : वसतीगृह अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी जिल्ह्यातील बेघरांसाठी ठाणे जिल्ह्यातील बालाघाट, अकोला येथून मदतीचा हात मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील बेघरांची शासकीय वसतीगृहात व्यवस्था करण्यात आली आहे.
येथे दररोज जिल्हा बाहेरून येणाऱ्या बेघर, निराधार, परराज्यातील मजूर कामगारांची निवासासह भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र शासनाची व्यवस्थादेखील अपुरी पडत असल्याने वसतीगृह अधीक्षक रजनी वैद्य यांनी आपल्या संपर्कातील उच्च पदावर असणाºया परिचित अधिकाऱ्यांना बेघरांच्या मदतीसाठी आवाहन केले. क्षणाचाही विलंब न करता तात्काळ ठाणे जिल्ह्यातील डिव्हिजन लेखाधिकारी गणेश ठाकरे तसेच एलआयसी ऑफिसर बालाघाट येथील सविता अरुणाकर तसेच कृषी विद्यापीठ अकोला येथील प्राध्यापक महिपाल गणवीर यांनी वसतीगृहात थांबलेल्या निराधारांसाठी माक्ससह इतर जीवनावश्यक साहित्य व आर्थिक मदत पाठविली आहे. कोरोना संसर्गामुळे प्रत्येकाला आपला जीव महत्वाचा झाला आहे. त्यामुळे संकटाच्या काटात मदतीसाठी देखील अनेकांची हात पुढे येत आहे. वसतीगृह अधीक्षक वैद्य यावेळी बोलताना म्हणाल्या, शहरातून तर मदत होतच आहे मात्र या बेघरांना फक्त अन्नच नव्हे तर इतर देखील गरजांची मदत आवश्यक होती.
यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून मी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही प्राध्यापक तसेच वरिष्ठ अधिकाºयांनी बेघरांसाठी मदतीचा हात दिला आहे. यावेळी बेघरांना सोशल डिस्टन्सिंगचा वापर करीत जीवनावश्यक वस्तू तसेच स्कॉर्पचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी वसतीगृहातील कर्मचारी दिवस-रात्र स्वत:च्या जीवाची परवा न करता बेघरांसाठी परिश्रम घेत आहेत. वसतीगृह अधीक्षक रंजना वैद्य, कर्मचारी वैशाली गजभिये, अश्विनी नागदेवे, अनिता बुचडे, राधेश्याम बुचडे, सीमा सुखदेव, त्रिशिला बागडे, गीता बागडे, विनोद गोंन्नाडे, कारेमोरे, स्वंपाकी यांच्यासह मोहन धारगावे बेघरांसाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Balaghat received help for the homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.