लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : तुमसर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी अंतर्गत असलेल्या बघेडा येथील आरोग्य उपकेंद्रात गत अनेक दिवसांपासून डॉक्टर नसल्याने रुग्णांची हेळसांळ होत आहे. सध्या येथील कारभार एका परिचारीकेवर आहे. रुग्णांना येथे औषधोपचार होत नसल्याने नागरिकांमध्ये आरोग्य विभागाविरोधात संताप व्यक्त होत आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. याचा सर्वाधीक फटका ग्रामीण भागातील रुग्णांना त्रास होत आहे. गर्रा, बघेडा, आसलपाणी, मोठागाव, गाळकाभोंगा, कारली येथील जवळपास सात हजार लोकसंख्या मिळून बघेडा येथे उपकेंद्र आहे. उपकेंद्राचा अनेक रुग्ण लाभ घेत होते. परंतु परिस्थिती उलट पाहावयास मिळत आहे. एनआरएचएम अंतर्गत एक डॉक्टर व एक नर्सची नियुक्ती आहे. परंतु गत १५ दिवसांपासून डॉक्टर येत नसल्याने संपूर्ण भार नर्सवर आलेला आहे. नर्स ही बीपी व शुगर अशा अतिशय गरजू कार्डधारक रुग्णांना डॉक्टरच्या सल्याशिवाय औषध देत नाही. दरम्यान वेळेवर औषध न मिळाल्यास रुग्णांसोबत अनुचित प्रकारही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील डॉक्टरची कोविड-१९ विषयी नागपूर जिल्ह्यात नियुक्ती झाल्याची माहिती आहे. त्यांनी नर्सला औषधाविषयी सांगीतले आहे. परंतु डॉक्टरचा कार्यभार नर्स सांभाळणार काय? औषध व्यवस्थित मिळणार काय, असे अनेक प्रश्न रुग्णासमोर पडले आहेत.सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाची भीती आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत कुणाला साधा ताप, खोकला आला तरी घाबरुन जातात. आरोग्य उपकेंद्रात गेल्यास तेथे डॉक्टर नसल्याने रुग्णांचे समाधान होत नाही. यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने डॉक्टर नियुक्त करण्याची मागणी होत आहे.बघेडा उपकेंद्रात आदिवासी बहुल गावातील रुग्ण येतात. डॉक्टर नसल्याने आल्यापावली परतावे लागते. येथील डॉक्टरनी कोविड-१९ निमित्त नागपूर जिल्ह्यात नियुक्ती झाल्याचे फोनवर सांगितले. गत १५ दिवसांपासून डॉक्टरविना उपकेंद्र सुरू आहे. रुग्णांची समस्या लक्षात घेऊन येथे त्वरित पूर्ण वेळ डॉक्टरची नियुक्ती करावी.-प्रतिमा अशोक ठाकूर, सरपंच, बघेडा.
बघेडा आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. याचा सर्वाधीक फटका ग्रामीण भागातील रुग्णांना त्रास होत आहे. गर्रा, बघेडा, आसलपाणी, मोठागाव, गाळकाभोंगा, कारली येथील जवळपास सात हजार लोकसंख्या मिळून बघेडा येथे उपकेंद्र आहे. उपकेंद्राचा अनेक रुग्ण लाभ घेत होते. परंतु परिस्थिती उलट पाहावयास मिळत आहे. एनआरएचएम अंतर्गत एक डॉक्टर व एक नर्सची नियुक्ती आहे.
बघेडा आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर
ठळक मुद्देडॉक्टरांचा अभाव : रुग्णांची हेळसांळ, डॉक्टरची तातडीने नियुक्तीची मागणी