शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

वनकर्मचाऱ्यांवर जमावाचा कुऱ्हाडीने हल्ला; वाहन पेटविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2023 21:25 IST

Bhandara News शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याकरिता गेलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या पथकावर सुमारे २० ते २५ अतिक्रमणधारकांनी लाठीकाठी व कुऱ्हाडीने हल्ला केला.

भंडारा : शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याकरिता गेलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या पथकावर सुमारे २० ते २५ अतिक्रमणधारकांनी लाठीकाठी व कुऱ्हाडीने हल्ला केला. एवढेच नाही तर तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना तुमसर तालुक्यातील गोंडीटोला येथे शुक्रवारी घडली. या घटनेमुळे वनवृत्तात एकच खळबळ उडाली आहे.

तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बपेरा सहवनक्षेत्रातील मौजा गोंडिटोला (सुकळी) येथील गट क्रमांक २३ व ३६/२ मध्ये १५ ते २० आदिवासी लोकांनी शासकीय जागेवर काही दिवसापूर्वी अतिक्रमण केले होते. त्यांना वारंवार तोंडी व लेखी सूचना देवूनही अतिक्रमण सोडले नाही. या प्रकरणी आतापर्यंत ४ वनगुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, २४ मार्च रोजी सोड्या येथील बिटरक्षक डी. ए. कहुळकर, क्षेत्र सहाय्यक यु. के. ढोके, बिट रक्षक ए. जे. वासनिक, डी. जे. उईके, वनरक्षक ए. डी. ठवकर व वनमजुर इमारचंद शिवणे हे वन कर्मचाऱ्यांचे पथक सकाळी १०.३० वाजता दरम्यान गस्तीवर असताना त्यांना अतिक्रमण सुरू असलेले दिसले. अतिक्रमणधारकांना ट्रॅक्टर बाहेर काढण्याकरिता सांगितले असता त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी छगन राहांगडाले शासकीय वाहनाने कर्मचाऱ्यांसह अतिक्रमणस्थळी गेले असता २५ ते ३० महिला व पुरूषांच्या जमावाने लाठ्या-काठ्या, पेट्रोलची बॉटल व कुऱ्हाडीने वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यात पाच वनकर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.धक्काबुक्की व धमकीवनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले व बिटरक्षक कहुळकर यांचे कॉलर पकडून जमावाने धक्काबुक्की केली. इतर कर्मचाऱ्यांना तात्काळ निघुन जा, अन्यथा तुम्हाला कुऱ्हाडीने तोडून टाकु व पेट्रोल टाकून पेटवू, अशी धमकी दिल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. एवढेच नाही तर जमावाने दगडफेक करून एमएच ३६ के १८१ या शासकिय वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी