शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

जागरुक ग्राहक काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:57 IST

संघटन शक्ती मजबूत असेल तर त्याला न्याय मिळतोच. अन्यायाला सहन न करता त्याला वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी प्रक्रियेची माहिती असली पाहिजे तर काम सोपे होते. जागरुक ग्राहक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य तथा ग्राहक संघटनेने प्रतिनिधी ज्ञानेश्वर बोडखे यांनी केले.

ठळक मुद्देमार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले व उपस्थित अधिकारी.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संघटन शक्ती मजबूत असेल तर त्याला न्याय मिळतोच. अन्यायाला सहन न करता त्याला वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी प्रक्रियेची माहिती असली पाहिजे तर काम सोपे होते. जागरुक ग्राहक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य तथा ग्राहक संघटनेने प्रतिनिधी ज्ञानेश्वर बोडखे यांनी केले.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत सामाजिक न्याय भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले होते तर प्रमुख पाहूणे म्हणून, अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, वैध मापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक रा.व. भास्करे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे उपस्थित होते.ग्राहक हा राजा आहे, त्यास संरक्षण मिळाले पाहिजे या उदात्त कल्पनेतून २४ डिसेंबर १०८६ रोजी ऐतिहासिक ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. फसवणूक झाली तर त्याला न्याय मिळावा, तसेच त्याचा मोबदला मिळावा यासाठी बिंदू माधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीची सुरुवात केली, असेही बोडखे म्हणाले. आॅनलाईन खरेदीवर अंकुश लावला पाहिजे. कायद्याच्या कवचाचा ग्राहकांनी योग्य वापर केला पाहिजे. तसेच समाजाला जागृत करण्याची जबाबदारी आपली आहे. ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी जनसामान्यापर्यंत पोहचवावी, असेही ते म्हणाले. ग्राहक संरक्षण कायद्यातील सुरक्षेचा अधिकार, वस्तू निवडीचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार, आरोग्याचा अधिकार या बाबीवर विस्तृत मार्गदर्शन त्यांनी केले.कोणाचीही फसगत होत असेल तर जनतेनी त्यास सहकार्य केले पाहिजे. तरच खेरदीच्या व्यवहारात पारदर्शकता येईल व प्रत्येक ग्राहकास न्याय मिळेल. त्यासाठी जनतेनी आपली मानसिकता बदलविणे आवश्यक आहे. ग्राहकांनी आपल्या हक्काची जाणीव ठेवली पाहिजे. पदाधिकाºयांनी ग्राहक चळवळ जोमाने वाढवावी जेणेकरुन सर्वांना न्याय मिळेल, असे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी सांगितले. अन्न भेसळी बाबत दुकानदारावर पूर्वी खटला दाखल होत होता. परंतु २०११ च्या मानदे कायद्यानुसार भेसळीचे किंवा फसवणुकीचे प्रमाण पाहून कारवाई करण्यात येते. त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे यांनी सांगितले. वैध मापन शास्त्र कायदा २००९ ला अस्तित्वात आला असून त्यामध्ये दुकानदाराचे नाव, वजन, एमआरपी, पॅकींग केव्हा व कोठे झाले याबाबत माहिती घेतली जाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी केले तर संचलन व उपस्थिताचे आभार पल्लवी मोहाडीकर यांनी मानले.