शहरं
Join us  
Trending Stories
1
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
2
मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
3
टिंडरवर मैत्री, भेटायला बोलावलं; जेवताना ती म्हणाली बाथरूममध्ये जा, बाहेर येताच तरुणाचा खेळ खल्लास!
4
Diesel Price Hike: युद्धाचा परिणाम, 'या' डिझेलच्या दरात २८ रुपयांची वाढ; पाहा कोणावर पडणार आर्थिक भार
5
मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड
6
अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय
7
सौदी आता अमेरिकेपासून चार हात लांब; मोहम्मद बिन सलमान यांचा पुतिन यांना फोन, राजकीय पट बदलणार!
8
बारामती बिनविरोध नाही? काँग्रेस उमेदवार देणार, पक्षश्रेष्ठींचा होकार; लवकरच जाहीर करणार!
9
फलंदाजीत कमाल, पण बोलंदाजी नडली, आक्षेपार्ह शेरेबाजीमुळे अभिषेक शर्मावर BCCI ने केली कठोर कारवाई 
10
कोण आहेत १६७ कोटींची पेटिंग खरेदी करणारे सायरस पूनावाला? 'वॅक्सिन किंग'च्या नावानं आहेत प्रसिद्ध, नेटवर्थ किती?
11
पाकिस्तानात तेलाचा भडका! पेट्रोल 458, डिझेल 520 रुपयांवर, जनतेला वाऱ्यावर सोडून US ला करतोय पुरवठा? होतेय भारताशी तुलना
12
नमिता थापर यांच्या 'एमक्योर'चा मास्टरस्ट्रोक! वजन कमी करण्याचे इंजेक्शन ५५% स्वस्त, नवीन किंमत आवाक्यात
13
नराधमपणाचा कळस! मुलाचा आजार बरा करण्यासाठी पोटच्या मुलीचा बळी; आईनेच आवळला गळा
14
Gold Silver Rate Today: कच्च्या तेलाच्या किमतीत १२ टक्क्यांच्या मोठ्या तेजीमुळे सोन्या-चांदीचे दर आपटले; लग्नसराईच्या काळात खरेदीची उत्तम संधी?
15
पाकिस्तानवर अफगाणिस्तानचे 'सर्जिकल स्ट्राइक', रणगाडे घुसवून सैनिकी तळ उद्ध्वस्त ! तीन पाक सैनिक ठार, अनेक गंभीर
16
लालबागच्या जैन मंदिरात पावणे दोन कोटींची चोरी; पळून जाणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशात फिल्मी स्टाईल अटक!
17
मोठा अनर्थ टळला! साखरपा येथे खासगी आराम बस जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप 
18
हा काय घाणेरडा प्रकार? संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये जिवंत माश्याचं कॉकटेल, सोशल मीडियावर संताप
19
OTP चं टेन्शन संपणार, आता SIM बदलताच ब्लॉक होणार बँक अकाऊंट; पाहा काय आहे नवं सायलेंट ऑथेंटिकेशन
20
"आम्हाला वाटलं फटाके फुटतायत, पण..."; चिमुरडीच्या डोक्यात घुसली गोळी! गँगवॉरने घेतला निरागस जीव
Daily Top 2Weekly Top 5

कर्मकांड टाळत संविधानाला वंदन करून गृहप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:52 IST

ना सत्यनारायणाची पूजा, ना कोणते कर्मकांड. जिजाऊ राजमाता, शिवधर्म गाथा, ग्रामगीता, तुकोबांचे अभंग आणि भारतीय संविधानाला त्रिवार वंदन करीत एका कुटुंबाने गृहप्रवेश केला. कर्मकांडाला फाटा देत उचललेले हे प्रेरणादायी पाऊल सध्या तुमसर शहरात सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. ही आगळीवेगळी गृहप्रवेशाची संकल्पना राबविली अनिल भुसारी आणि शीतल भुसारी या शिक्षक दांपत्याने.

ठळक मुद्देप्रेरणादायी पाऊल : आईवडिलांच्या हस्ते कापली फित, भुसारी दाम्पत्याचा अभिनव उपक्रम

राहूल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ना सत्यनारायणाची पूजा, ना कोणते कर्मकांड. जिजाऊ राजमाता, शिवधर्म गाथा, ग्रामगीता, तुकोबांचे अभंग आणि भारतीय संविधानाला त्रिवार वंदन करीत एका कुटुंबाने गृहप्रवेश केला. कर्मकांडाला फाटा देत उचललेले हे प्रेरणादायी पाऊल सध्या तुमसर शहरात सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. ही आगळीवेगळी गृहप्रवेशाची संकल्पना राबविली अनिल भुसारी आणि शीतल भुसारी या शिक्षक दांपत्याने.प्रत्येकाच्या मनात एक स्वप्नातील घर असते. घर बांधण्यासाठी आटापीटा केला जातो. आयुष्याची अर्धी अधिक पूंजी या घरावर खर्ची घातली जाते. वैज्ञानिक आधार घेत घराचे बांधकामही केले जाते. मात्र गृहप्रवेश आला की मग डोक्यात शिरतात ते कर्मकांड. सत्यनारायण, वास्तूशांती, होमहवन आदी धार्मीक उत्सव केले जातात. उच्चशिक्षिताने बांधलेल्या घरीही असे कर्मकांड होण्याचे प्रकार सर्वत्र दिसून येतात. परंतु या सर्व बाबीला एका पुरोगामी विचाराच्या शिक्षक दांपत्याने फाटा दिला. मन, मेंदू आणि मस्तक यांना गहाण न ठेवता त्यांनी पुरोगामी विचारातून आईबाबांच्या हस्ते फित कापून गृहप्रवेश केला.भुसारी परिवार हा मोहाडी तालुक्यातील खैरलांजी येथील रहिवासी. तुमसर येथे नोकरीच्या निमित्ताने त्यांचा निवास. या ठिकाणी त्यांनी आपले घर बांधले. या घराच्या गृहप्रवेशासाठी त्यांनी निर्माण केलेला पायंडा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. याठिकाणी राजमाता जिजाऊ, शिवधर्म गाथा, ग्रामगीता, तुकोबाचे अभंग आणि भारतीय संविधानाला वंदन करून घरात प्रवेश केला. हा सोहळा अनुभवण्यासाठी तुमसरकरही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल डोंगरे व चंद्रकांत लांजेवार यांनी शिवधर्म गाथेचे वाचन व तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले. अभंगांचे अर्थही स्पष्ट केले. आनंददायी जीवन जगण्याचा संदेश केदार नाकाडे यांनी दिला. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि पुरोगामी विचार स्वीकारणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.