शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुदतीनंतर पैसे देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:12 IST

ग्राहकांची पोस्ट आॅफीसवरील विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यावर पोस्टमास्तरच्या अरेरावीने ग्राहकांसह अधिकर्ते देखील त्रस्त झाले आहेत. बहुतांश बंद पडत असलेल्या पोस्ट खात्याला बँकिंगप्रणाली जोडून पंतप्रधानांनी नवसंजीवनी दिली आहे. मात्र त्या नवसंजिवनीचा चांगलाच फायदा पोस्ट मास्तरसह कर्मचारी उचलत असल्याचे निदर्शनात येत आहे.

ठळक मुद्देतुमसरच्या पोस्टमास्तरची अरेरावी : ग्राहकांसह अधिकर्ते झाले त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पोस्टात उघडलेली आरडी व इतर बचत खात्यांची मुदत संपूनही येथील पोस्टमास्तर ग्राहकांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे ग्राहकांची पोस्ट आॅफीसवरील विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यावर पोस्टमास्तरच्या अरेरावीने ग्राहकांसह अधिकर्ते देखील त्रस्त झाले आहेत.बहुतांश बंद पडत असलेल्या पोस्ट खात्याला बँकिंगप्रणाली जोडून पंतप्रधानांनी नवसंजीवनी दिली आहे. मात्र त्या नवसंजिवनीचा चांगलाच फायदा पोस्ट मास्तरसह कर्मचारी उचलत असल्याचे निदर्शनात येत आहे. तुमसर तालुक्याच्या ठिकाणी बँकीग सेवा असलेले डाकघर (पोस्ट आॅफीस) आहे. नागरिकाकडून विविध प्रकारचे आरडी व बचत खाते पोस्टाच्या अभिकर्त्यांमार्फत काढले गेले आहे.तीन वर्षे, पाच वर्षे, १० वर्षे अशी आरडीची मॅच्युरिटी झालेले ग्राहक स्व:हक्काचे पैसे घेण्यास पोस्टात गेले असता पोस्टमास्तरकडून आज या उद्या या, असे म्हणून खाते विड्राल करण्याकरिता दीड ते दोन महिने लांबणीवर घालत आहेत. याबाबत चर्चा केल्यास केल्यास पोस्टमास्तर ग्राहकांशी असभ्य व अरेरावीने उत्तरे देत त्यांना परत पाठवित आहेत. त्यामुळे त्रस्त झालेले ग्राहक पोस्टाच्या अभिकर्त्यांना पकडून धारेवर धरत आहे.अभिकर्ते देखील या प्रकाराला कंटाळले आहेत. त्यामुळे विश्वास संपादन केलेल्या डाक विभागात जर असेच प्रकार सुरु राहिले तर भविष्यात आरडी व इतर कलेक्शन मिळणे बंद होवून परत पोस्ट विभाग डबघाईस निघण्यास वेळ लागणार नाही. यासंदर्भात पोस्टमास्तर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस