शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मावशीने भाचीला दिले गुंगीचे औषध, बनविला आक्षेपार्ह व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 11:26 IST

मावशीने तिला आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ दाखविले तसेच कोणाला सांगू नकोस, अशी दमदाटी केली. त्यानंतर वर्षभर हा सर्व प्रकार सुरू राहिला.

ठळक मुद्देसाकोली तालुक्यातील घटनावर्षभरापासून सुरू होता छळ

साकोली (भंडारा) : चहात गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करत मावशीने एका मुलाच्या साह्याने आपल्याच भाचीचे (बहीण-लेक) आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. म्हणायला गेलं तर, मावशी ही दुसरी आईच मात्र, या प्रकाराने एका पवित्र नात्याला काळीमा फासल्या गेलीये.

पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत शोषण करण्याचा प्रकार एका वर्षापासून सुरू होता. अखेर हिम्मत करून पीडितेने तक्रार दिल्यानंतर शोषण करणाऱ्या मुलाला व मावशीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना साकोली तालुक्यातील असून पीडिता ही गोंदिया जिल्ह्यातील आहे. गोवर्धन गोविंदा बावनकुळे (२५, रा. शिवनी मोगरा, ता. लाखनी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

माहितीनुसार, मार्च २०२१ मध्ये पीडित मुलगी व तिची आई साकोली तालुक्यातील एका गावात मावस बहिणीकडे विवाह समारंभाकरिता आली होती. समारंभ आटोपल्यानंतर दोघीही मुक्कामी थांबल्या. त्यावेळी मावशीने पीडितेला चहा दिला व तिला वर धाब्यावर साड्या पाहण्याकरिता बोलाविले. काही क्षणातच पीडित मुलीला चक्कर आली. काही वेळानंतर मुलगी उठली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यावेळी तिने आपल्या मावशीला विचारले असता, मावशीने तिला आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ दाखविले तसेच कोणाला सांगू नकोस, अशी दमदाटी केली.

त्यानंतर वर्षभर हा सर्व प्रकार सुरू राहिला. ज्या मुलाने मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ तयार केला तो पीडित मुलीला वारंवार फोन करून तिच्या गावी जायचा व तिचे शोषण करायचा. पीडित मुलीने विरोध केल्यास व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. दरम्यान, मागील महिन्यात पीडित मुलीच्या गावी पुन्हा एक लग्न समारंभ असल्याने सर्व नातेवाईक तेथे आले. त्यावेळी मावशीने मुलीला बाहेर चौकात फिरायला नेले असता हा सर्व प्रकार उघडकीला आला.

पीडितेच्या आई-वडिलांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पीडिता व तिच्या पालकांच्या तक्रारीवरून मुलगा व तिच्या मावशीविरोधात विविध कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे. पुढील तपास साकोली पोलीस करत आहेत.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून साकोली पोलीस ठाणे येथे मुलगा व मावशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

- जितेंद्र बोरकर, ठाणेदार, साकोली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsakoli-acसाकोली