शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ऑर्डिनन्स फॅक्टरीतून स्फोटक उत्पादनाचे साचे चोरण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:46 IST

सुरक्षा रक्षकांची सतर्कता: दोन कंत्राटी कामगारांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : स्फोटके तयार करण्यासाठी वापरल्या जाणान्या १४ साच्यांची (डाय) चोरी करताना दोन कंत्राटी कामगारांना मंगळवारी रात्री सुरक्षारक्षकांनी पकडले. ही घटना भंडारा ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये घडली, तपासादरम्यान त्यांच्याकडून १४ साचे जप्त करण्यात आले आहेत. या चोरीमागील त्यांचा उद्देश काय होता, हा आता तपासाचा भाग आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्डिनन्स फॅक्टरी, भंडारा येथील कॉर्पोरटीकरणानंतर उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरी, भंडारा हा स्फोटक सामग्री बनवणारा कारखाना आहे. येथे देशाच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे अनेक प्रकारचे स्फोटक साहित्य तयार केले जाते. कारखान्यातील देखभाल व देखभालीचे काम कंत्राटी पद्धतीने देण्यात आले आहे. सकाळी आणि संध्याकाळी पाळीत कामावर येणाऱ्या कामगारांची तपासणी सुरक्षारक्षकांकडून केली जाते. 

दरम्यान, १० ऑक्टोबरच्या संध्याकाळी, नियमित तपासणीदरम्यान, सुरक्षारक्षकाने कंत्राटदाराच्या हाताखाली काम करणारा मजूर महेंद्र रामटेके (रा. कोंढी) याच्याकडून स्फोटके तयार करण्यासाठी वापरले जाणारे १४ साचे जप्त केले. 

सुरक्षा विभागाकडून कारवाईत चालढकल ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या प्रॉडक्शन बिल्डिंगमधून साचे चोरीच्या घटना यापूर्वीही नोंदल्या गेल्या आहेत. तक्रारीही अनेक वेळा करण्यात आल्या; मात्र सुरक्षा विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची कामगार वर्गात चर्चा आहे. येथील एनडीजीबीजीओए यूनियनने लेखी पत्र देऊन कारखाना प्रशासनाकडे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी दुवे उजेडात येतील, अशी शंकाही या पत्रातून वर्तविली आहे. ठेकेदाराने बांधलेल्या अंतर्गत गोदामाची चौकशी केल्यास आणखी अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे युनियनचे म्हणणे आहे.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न यानंतर सुरक्षा विभागाने है प्रकरण दडपून आपले हात ओले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नंतर या घटनेची तक्रार जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून महेंद्र रामटेके आणि चकोले या दोन आरोपींना १५ ऑक्टोबरच्या रात्री अटक केली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस तपास करत आहेत. 

टॅग्स :bhandara-acभंडारा