शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात पेट्रोल ओतून शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:42 IST

शाळेत दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त एका सहायक शिक्षकाने शिक्षकांच्या बैठक खोलीत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना तुमसर येथील जनता विद्यालयात शुक्रवारी घडली.

ठळक मुद्देअपमानास्पद वागणुकीमुळे होते त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शाळेत दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त एका सहायक शिक्षकानेशिक्षकांच्या बैठक खोलीत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच सहकारी शिक्षक धावून आल्याने त्यांचे प्राण वाचले. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना तुमसर येथील जनता विद्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. अनिल पतीराम मेश्राम (४२) रा. मॉडेल टाऊन रा. इंदोरा (नागपूर) असे शिक्षकाचे नाव आहे.शुक्रवारी सकाळी ११ वाजता सहायक शिक्षक अनिल मेश्राम हे शिक्षकांच्या बैठक खोलीत दाखल झाले. शाळेत मला मानसिक, आर्थिक त्रास देवून अपमानास्पद वागणूक देतात, असे म्हणून पेट्रोलची बॉटल काढली. पेट्रोल अंगावर ओतले. आग लावण्याकरिता माचीसची काडी घेतली. इतक्यात प्रसंगावधान राखून सहकारी शिक्षकांनी त्यांचा हात पकडला. त्यांना समजावून शांत केले. या घटनेने शाळेत एकच खळबळ माजली. मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी सहायक शिक्षक मेश्राम यांना घेऊन गेले.तत्पूर्वी सहायक शिक्षक अनिल मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीत, शाळेत मानसिक, आर्थिक व अपमानास्पद वागणूक देत असल्याचे नमूद केले आहे. सदर प्रकरणाची तुमसर पोलिसांनी चौकशी करून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षक अनिल मेश्राम यांच्यावर ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक मेश्राम यांची वैद्यकीय तपासणी केली तथा शाळेत येऊन पंचनामा केला.

सदर प्रकरणात सध्या चौकशी सुरू असून आत्मदहन करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कारणांची सखोल चौकशी करण्यात येईल. या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.-मनोज सिडाम, पोलीस निरीक्षक तुमसर.

टॅग्स :Teacherशिक्षक