शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

...अन् सलून व्यावसायिकानं अंगावर पेट्रोल ओतून घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 12:40 IST

 भंडारा शहरातील काही व्यवसायीकांनी आपली दुकाने सुरु केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या पथकाने कारवाई सुरु केली. पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले. काही कळायच्या आत व्यवसायिकाने सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले.

ठळक मुद्देनगरपरिषद पथकासमोरील प्रकारलॉकडाऊनमध्ये सलून उघडे असल्याने कारवाईसाठी गेले होते पथक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनमध्ये उघडे असलेल्या सलूनवर कारवाईसाठी गेलेल्या नगरपरिषदेच्या पथकासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न सलून व्यवसायिकाने केल्याची घटना येथील राजीव गांधी चौकात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सलून व्यवसायीकाला वेळीच अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लॉकडाऊनमध्ये शासनाने सलून बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु शहरातील काही व्यवसायीकांनी आपली दुकाने सुरु केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या पथकाने कारवाई सुरु केली. एक पथक बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास येथील राजीव गांधी चौकात गेले. त्याठिकाणी सलून दुकान सुरु होते. याबाबत विचारणा केली असता तेथील नोकरांनी मालक प्रमोद केसलकर (३५) रा.शुक्रवारी वॉर्ड यांना बोलावले. राजीवगांधी चौकात येताच पथकाने पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले. काही कळायच्या आत त्यांनी सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. हा प्रकार पाहून नगरपरिषद पथकातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या सहकाºयांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान या प्रकरणी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी खुशाल कळंबे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गत तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे दुकान बंद आहे. २० हजार रुपये दुकानाचे भाडे व कामगारांचा पगार देणे कठीण झाले आहे. त्यातच नगरपरिषदेने पाच हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा दिला. त्यातून प्रमोद केसलकरने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याfireआग