शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोर सीटी- 1 वाघाचा मुक्काम वडसा जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 23:42 IST

चिमूर वनपरिक्षेत्रात जन्म झाल्याने सीटी- १ (चिमूर टायगर- १) म्हणून या वाघाची ओळख आहे. अडीच वर्षांच्या या वाघाने आतापर्यंत लाखांदूर, वडसा आणि ब्रम्हपुरी या भागात १२ जणांची शिकार केली आहे. सर्वात पहिली शिकार २७ जानेवारी रोजी लाखांदूर वनपरिक्षेत्रात केली होती. त्यानंतर विविध भागात हल्ले करून माणसांना ठार मारले. हल्लेखोर वाघाने शिकार करण्याची सवय बदलली असून तो रात्रीच्या वेळीच शिकार करतो.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन जिल्ह्यात १२ जणांचा बळी घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर सीटी- १ वाघाने आपला मुक्काम लाखांदूर तालुक्याच्या  इंदोरा जंगलातून जिल्ह्याच्या सीमेवरील वडसा जंगलात हलविला आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी गत आठ दिवसांपासून वनविभाग प्रयत्न करीत असला तरी चलाख वाघ त्यांना सतत हुलकावणी देत आहे. यामुळे लाखांदूर तालुक्यातील गावांमध्ये वाघाची दहशत कायम असून वनविभाग वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.चिमूर वनपरिक्षेत्रात जन्म झाल्याने सीटी- १ (चिमूर टायगर- १) म्हणून या वाघाची ओळख आहे. अडीच वर्षांच्या या वाघाने आतापर्यंत लाखांदूर, वडसा आणि ब्रम्हपुरी या भागात १२ जणांची शिकार केली आहे. सर्वात पहिली शिकार २७ जानेवारी रोजी लाखांदूर वनपरिक्षेत्रात केली होती. त्यानंतर विविध भागात हल्ले करून माणसांना ठार मारले. हल्लेखोर वाघाने शिकार करण्याची सवय बदलली असून तो रात्रीच्या वेळीच शिकार करतो. आपर्यंत बाराजणांचा बळी घेतल्याने तो जंगलात राहण्यायोग्य नसल्याच्या निष्कर्षाप्रत वनविभाग आले आहे. त्यामुळेच त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग जीवाचे रान करीत आहे. मात्र, तो हुलकावणी देत तीन जिल्ह्याच्या सीमावर्ती जंगलात भटकत आहे. तो कधीही जिल्ह्यातील जंगलात शिरण्याची शक्यता असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

लाखांदूर तालुक्यात मचाणीवर खडा पहारा

- इंदोरा जंगलात २० सप्टेंबर रोजी अरुण मंडल हा व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. त्यानंतर या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आदेश दिले. शार्पशूटरसह वनविभागाच्या पथकाने जंगल पालथे घातले. इंदोरा जंगलात पाच ठिकाणी मचाण उभारून खडा पहारा देण्यात आला. तो या परिसरात आला की त्याला कोणत्याही परिस्थितीत बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे.

सीटी- १ वाघ सध्या वडसा भागात आहे. मात्र, भंडारा वनविभागाची गस्त सुरु आहे. त्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी कर्मचारी जंगलात तैनात आहे. वाघ टप्प्यात आला की त्याला जेरबंद करण्यात येईल. - राहूल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा

सीटी-१ वाघ आणखी कुणाचा बळी घेण्यापुर्वी त्याला बेशुद्ध करून जेरबंद करणे आवश्यक आहे. वनविभागाचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे.- शाहिद खान, मानद वन्यजीव रक्षक, भंडारा.

 

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव