मोहाडी : विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बरेच स्थित्यंतर झाले. घराघरात टी.व्ही., एलसीडीच्या रुपात मनोरंजनासाठी होमथिएटर आले. अशा विपरित परिस्थितीत ग्रामीण कलावंतानी आपल्या प्रतिभेचा वारसा लोककलेच्या माध्यमातून जपून ठेवला आहे.सध्या गावागावात मंडईचा माहौल सुरु झाला आहे. चोर पावलांनी थंडीची चाहूल आरंभ झाली आहे. चोर पावलांनी थंडीची चाहूल आरंभ झाली आहे. ग्रामीण भागात लोककला जीवंत ठेवणारी प्रतिभा संपन्न कलावंत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या कलेचा अविष्कार प्रदर्शित करीत आहेत. खरीप पीक पाण्याअभावी कमजोर झाले. धानकिडींनी त्यात भर घातला. धान उत्पादनात प्रत्यक्ष घट दिसू लागली. तरीही धान पीक कमी येण्याचे शल्य बाजूला सारुन ग्रामीण भाग मंडईच्या कार्यक्रमात न्हाऊ न जात आहे.मोहाडी तालुक्यात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून मंडईचा माहौल सुरु झाला आहे. पश्चिमेकडील खमारी, खुटसावरी, मांडेसर, रामपूर ही लोधी पट्टयातील गावात ठरल्या दिवशी वार्षिक दंडारीचे, नाटकांचे कार्यक्रम होतात. पुढे हा मंडईचा वातावरण सरकत-सरकत सिरसोली, कान्हळगाव येथे येतो. मोहाडी नगरात वार्डा-वार्डात मंडईची धुम असते. मंडईच्या निमित्ताने पाहुण्यांची रेलचेल असते. मंडईचा मुहूर्त बघूनच पाहुण्यांचे नियोजन ठरले असते. वर्षभर शेतीत घाम गाळणारी माणसे आपल्या आप्ताच्या भेटीसाठी येतात. तेवढयाच आदर सन्मानाने अतिथींचे स्वागत केले जाते. आपल्या कामातून सवड काढणारी ग्रामीण माणसे क्षीण बाजूला सारुन दंडार, तमाशा, खडीगंमत, कुस्त्याचा आखाडा आदी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेत असतात. मंडईच्या निमित्ताने गावागावात प्राधान्याने दंडारीचा कार्यक्रम होतो. दंडारीतून मनोरंजन व प्रबोधन केले जाते. रात्री नवरसप्रधान नाटीका सादर केल्या जातात. लोकवर्गणी व आपला पैसा लावून ग्रामीण कलावंत आपली कला नवअंकी नाटकांतून सादर करतात. नवरसाचा आधार घेऊ न नाटिकांचा लेखन करणारे लेखक दुर्मिळच. कान्हळगाव येथील स्व. श्रावण किटे, स्व. वामन ठवकर, सिरसोलीचे स्व. बळीराम कस्तुरे तसेच तेजराम मोहारे नव्या पिढीतील वसंत लिल्हारे, राजू मोहारे यांनी पौराणिक, आधुनिक नाटकांचे लेखन केले आहे.कान्हळगाव येथील नवोदित लेखक नितीन मोहारे यांनी रसिकांसाठी यावर्षी विद्रोही उर्फ आझाद देश के गुलाम या नाटकांची पटकथा लिहली आहे. शेतकऱ्यांचा व्यापरी कसे पिळवणूक करतात. नेते शेतकऱ्यांचा कसा वापर करतात. यावर लेखन नितीन मोहारे यांनी केले आहे. कान्हळगाव येथे १८ नोव्हेंबरला नाटीका प्रदर्शित केली जाणार आहे. तसेच शिक्षक वसंत लिल्हारे यांनी लिहलेली ‘आकाश ग्रहण’ ही नाटिका पारडी येथे २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. मंडईचा माहौल सद्या परमसिमेवर आहे. गावागावात आनंद अन् उत्साह आहे. मंडईमुळे गावोगावी उत्साहाचे उधान आले आहे. मंडईत नाटीका, दंडार, तमाशे, हंगामा, डान्स, आखाडे आदी पर्वणीची रेलचेल पंधरवाड्यांनतर थांबणार आहे. नंतर माम काळ््या मातीत राबणारा ग्रामीण शेतकरी पुन्हा दु:खाचा डोंगर घेऊ न धान कापणी, मळणीच्या कामात व्यस्त होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
मंडईचा माहौल अन् थंडीची चाहूल
By admin | Updated: November 15, 2015 00:27 IST