शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम लुटणारे जेरबंद; भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 16:07 IST

लाखांदूर तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे एटीएम लुटणाऱ्या चार जणांना शनिवारी पोलिसांनी रंगेहात जेरबंद केले. सर्व आरोपी हरियाणातील आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: लाखांदूर तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे एटीएम लुटणाऱ्या चार जणांना शनिवारी पोलिसांनी रंगेहात जेरबंद केले. सर्व आरोपी हरियाणातील आहेत.नरेंद्र राजेंद्र कुमार (३०), प्रवीण धरमालसिंग कुमार (२१), राजेश जिलेरसिंग राजपुत (३१) व दिलबागसिंग विशालसिंग सर्व रा. हिस्सार (हरियाणा) अशी आरोपींची नावे आहेत.एक महिन्यापूर्वी पवनी येथील स्टेट बँक ऑफ इंडियात अशा प्रकारची चोरी केली होती. तेथील पोलिस स्टेशनला त्यावेळी तक्रार दाखल केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांचा तपास सुरू होता. पवनीनंतर याच परिसरातील बऱ्याच ठिकाणी अश्या प्रकारच्या चोरीची शक्यता पोलिसांना वाटत होती. अखेर लाखांदूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परिसरात शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हे चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले.सदर चोरटे एखाद्या एटीएमधारक ग्राहकाच्या पाठोपाठ एटीएम मशीन रूममध्ये प्रवेश करतात. त्या व्यक्तीस कुठे अडचण येत असेल तर द्या मी सोडवून देतो अशा प्रकारचे वक्तव्य करतात. एकदा का त्यांच्या हाती एटीएम गेला की तो एटीएम त्यांच्याच दुसऱ्या साथीदाराला हस्तांतरित केला जातो. ग्राहकाने डायल केलेल्या पीन नंबरकडे बारकाईने लक्ष ठेवले जाते. नंतर तो पीन त्याच्या दुसऱ्या साथीदाराला सांगितला जातो. अशाप्रकारे एटीएमधारक व्यक्तीच्या अकाउंटमधील पैसा ही टोळी आपल्या खात्यात हस्तांतरित करीत असते.लाखांदूर पोलिसांनी या कारवाईत त्यांच्याकडून एक फॉर्च्युनर गाडी, 10 एटीएम कार्ड, 4 मोबाइल व एक स्वाईप मशीन हस्तगत केली आहे. सदर कारवाई लाखांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोहर कोरेटी पीआय कुरसंगे मेजर किसन मडावी पोलीस शिपाई बुरडे ड्रायव्हर भूपेश बावनकुळे यांनी केली. अधिक तपास पवनी पोलिस स्टेशनची टीम करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी